आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 'कमांडो'त दम नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फक्त अ‍ॅक्शन आणि अ‍ॅक्शनच बघायची असेल, तर प्रेक्षक सिनेमा का बघतील, त्याऐवजी ते मार्शल आर्टला पसंती देतील. जेव्हा आपण दोन तासांहून अधिक काळ या सिनेमात फक्त मारधाड, हवेत उडणा-या मनुष्यांचे नॉनस्टॉप सीन्स, ओडरणे झेलत असतो, तेव्हा आपल्या लक्षात येते की, प्रत्यक्षात हा सिनेमा एक कंटाळवाणा मोर्टल कॉम्बॅट व्हिडिओ गेम आहे, अशा गेममध्ये कल्पनाशक्तीच्या पलीकडे जाऊन काहीही करता येतं.

प्रत्यक्षात हा एक व्हिडिओ गेम आहे. सिनेमाच्या शेवटच्या दृश्यात व्हिलेन हीरोला त्याच्याबरोबर आणखी एक लढाई लढायला सांगतो, जेणेकरुन तो शेवटची लेवल पार करुन राजकुमारीला जिंकून घेईल. निश्चितच शेवटच्या स्तरावर हीरोचा सामना व्हिलनबरोबर होतो. हीरो हातात बंदुक न घेता मैदानात उतरतो. हा हीरो मार्शल आर्ट्समध्ये तरबेज आहे.

मात्र कोणतीही चुक करु नका. हा व्हिलनसुद्धा खूप खतरनाक आहे. व्हिलनची पार्श्वभूमी अशी आहे की, अमावस्येच्या रात्री त्याचा जन्म झाला. तो आपल्या डोळ्यातील भुबुळांशिवायसुद्धा बघू शकतो. दिलेरकोट या पंजाबी परिसरात त्याची सत्ता आहे. तो तरुणांना स्वस्त ड्रग्स विकण्याचे काम करतो आणि त्या परिसरातील सुपरिटेंडंट ऑफ पोलिसला आपला खास माणूस म्हणून नियुक्त करतो. हीरो एक आर्मी मॅन आहे आणि त्याचे म्हणणे आहे की, तो भारताच्या सीमेचे रक्षण करु शकतो मात्र त्यासाठी आधी आतील सफाई करायला हवी.

राजकारण्यांनी या आर्मी मॅनबरोबर खूप वाईट केले आहे. तो एका रुटीन व्यायामादरम्यान चीनमध्ये दाखल होतो. राजकारणी उघडपणे त्याला ओळख दाखवत नाहीत. आता त्याला राजकारण्यांचा सूड घ्यावाच लागणार आहे. याचदरम्यान तो एका डॉनच्या तावडीतून एका सुंदर मुलीची सुटका करतो.

सिनेमात व्हिलन आणि हीरो जास्तीत जास्ती वेळ वॉकी-टॉकीवर भांडताना दिसतात. हिरोईन हीरोला धीर देसत असते. ते दोघे जंगलात आहेत आणि व्हिलनची माणसं त्यांचा पाठलाग करत आहेत. तो व्हिलनच्या माणसांना एक एक करुन संपवतो.

हिंदी सिनेमांमध्ये ठुसे लगावण्याची एक परंपरा आहे. मास्टर विठल पासून ते धर्मेंद्रपर्यंत, त्यांचा मुलगा सनीपासून ते अजय देवगण आणि सुनील शेट्टी या अभिनेत्यांच्या अशाप्रकारच्या अ‍ॅक्शनला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. मात्र तरीसुद्धा आपल्या मुख्यधारेतील अ‍ॅक्शन सिनेमांचा लेखाजोखा नाहीये. 1988 साली 'कमांडो' नावाचा एक सिनेमा आला होता. या सिनेमात मिथून चक्रवर्ती आणि मंदाकिनी यांची प्रमुख भूमिका होती. अशाप्रकारच्या सिनेमांमध्ये रोमान्स, कॉमेडी, ड्रामा आणि कधी-कधी सस्पेन्सचा तडका असतो. मात्र या सिनेमात सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फक्त अ‍ॅक्शनच अ‍ॅक्शन आहे.

आज भारतात सिक्स पॅक्स आणि बायसेप्सची जी क्रेज आहे, तशी क्रेज 1980च्या दशकात अमेरिकेत अर्नाड श्वार्जनेगर आणि सिल्व्हेस्टर स्टेलॉनच्या काळात होती. त्यांना मसल्स आणि मासेसचा देवता म्हटले जात होते. मात्र तरीसुद्धा त्यांचे सिनेमे विचार आणि कथेत कमी नव्हते. स्टेलॉन यांना 'रॉकी'साठी ऑस्कर नामांकन मिळाले होते. मात्र या सिनेमाला एकच पुरस्कार मिळाला होता.

या सिनेमातील 34 वर्षीय हीरो विद्युत जामवालने आपले काम जोख बजावले आहे. सिनेमाच्या सुरुवातीला आपल्याला सांगण्यात येते की, सिनेमातील सगळे स्टंट्स विद्युतने बॉडी डबलचा वापर न करता स्वतः परफॉर्म केले आहेत. हे स्टंट्स घरी करु नका. कारण केवळ विद्युतच ते करु शकतो.

तो कमांडो आहे. ज्या लोकांना कमांडो म्हणजे कोण ते माहीत नाही, त्यांना कर्नल सांगतात की, कमांडो ती व्यक्ती असते जिचे वजन 65 किलो असतो. मात्र तो वीस हजार फुटांवरुन उडी मारु शकतो आणि 50 किलोचे वजन उचलून 60 किलोमीटरपर्यंत धावू शकतो. म्हणजेच एकटा कमांडो एक हजार सैनिकांच्या बरोबरीत असतो. असो, एक काम करा कमांडोला घेऊन एक ठिकठाक सिनेमा बनवा, जो प्रेक्षक बघू शकतील.