आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'साहिब बीवी और गँगस्टर\' उत्कृष्ट दिग्दर्शनाचा नजराणा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिक्वेल हा आता बॉलिवूडचा फॉर्मुला बनला आहे. मोठ्या ब्लॉकबस्टर सिनेमांचे सिक्वेल आले नाही तरच नवल. सिक्वेल बघणा-या लोकांच्या संख्येवरुन त्या सिनेमाचा प्रीक्वेल किती लोकांनी बघितला असेल, याचा अंदाज बांधता येऊ शकतो. मात्र बॉक्स ऑफिसवरच्या आकड्यांवरुन किती लोकांनी सिनेमा बघितला हे सांगता येऊ शकणे शक्य आहे. मात्र तो सिनेमा किती लोकांना आवडला हे सांगता येऊ शकत नाही. म्हणूनच 'दबंग'चा सिक्वेल बनला मात्र 'बॉडीगार्ड'चा नाही. कदाचित 'बॉडीगार्ड'चा सिक्वेल 'दबंग'च्या सिक्वेलपेक्षा जास्त हिट होऊ शकला असता.

'साहिब बीवी और गँगस्टर' हा सिनेमा 2011 साली रिलीज झाला होता. निश्चितच हा खूप हिट सिनेमा नव्हता. मात्र लोकांना हा सिनेमा आवडला होता. तो एक चांगला थ्रिलर सिनेमा होता. सिनेमात खूप रंजक वळण होते. सिनेमातील प्रमुख कलाकार शेवटी वाचतात. मात्र त्यांचे पुढे काय होणार हे प्रेक्षक जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. म्हणूनच कदाचित या सिनेमाचा सिक्वेल बनला. हा सिक्वेल प्रेक्षकांची अपेक्षापूर्ती करण्यात ब-याच अंशी यशस्वी झाला आहे.
सिनेमात जिमी शेरगिल 'साहिब' आहे आणि तो व्हिलचेअरवर आहे. दोन गोळ्यांनी जखमी होऊनसुद्धा तो खूप ताजातवाना दिसतो. त्याच्या खास लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र तो एकमेव बचावला आहे. त्याची सुंदर पत्नी 'बिवी' (माही गिल) विषयी त्याला आता आकर्षण उरलेले नाही. साहिबची 'बीवी' आता स्टाम्प पेपर एमएलए आहे. साहिबच्या विधानसभा क्षेत्रावर तिचे वर्चस्व आहे. त्याचे शेजारी असलेल्या जमीनदार मित्राचीही हीच कहाणी आहे.
हा सिक्वेल बघताना त्याच्या प्रीक्वेलची आठवण होणे गरजेचे नाही. सिनेमात एक नवीन 'गँगस्टर' आहे, जो पूर्ण खेळ बदलून टाकतो. सिनेमात आणखी एक 'बिवी' आहे. साहिबच्या या दुस-या बीवीची भूमिका सोहा अली खानने साकारली आहे. मात्र ती आपल्या भूमिकेमुळे लोकांना प्रभावित करु शकली नाही. सिनेमातील चारही पात्रांना इतके आयाम देण्यात आले आहे की प्रत्येकजण कसा आहे हे जाणून घेण्याची उत्कंठा लागून राहते.

'गँगस्टर'चे वंशज एकेकाळी जमीनदार होते. मात्र 'साहिब'च्या वंशजांनी त्यांना संपवले असते. 'गँगस्टर' राजा होऊ शकला असता. मात्र तो गँगस्टर बनला. म्हणूनच तो सूड उगवतो. या दोघांच्या कहाणीमध्ये डोकावले असता आपल्याला उत्तर प्रदेशमधील राजकारणातील 'टशन' दिसून येते. या संपूर्ण सिनेमाचे शुटिंग इनडोअर झाले आहे. एका हवेलीत हे शुटिंग झाले आहे.

'गँगस्टर' नेता बनतो. त्याचे नाव इंद्रजीत सिंग आहे. मात्र तो 'राजा भैय्या' या नावाने प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेशमधील नेता रघुराज सिंह उर्फ राजा भैय्या यांच्यावर इशारा करण्यात आला आहे. ही भूमिका इरफान खानने उत्कृष्टरित्या साकारली आहे. इरफान यापूर्वी तिग्मांशू धुलियाच्या 'हासिल' (2003) या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या नजरेत आला होता. त्याच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट भूमिकांमध्ये 'पान सिंग तोमर' (2012) या सिनेमाचा समावेश आहे.
तिग्मांशू धुलिया यांनी गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'गँग्ज ऑफ वासेपूर' यांच्या सिनेमाद्वारे अभिनय करिअरलासुद्धा सुरुवात केली होती. तिग्मांशू बहुमुखी प्रतिभेचा धनी असल्याचे समजते. ते उत्तम दिग्दर्शकाबरोबरच एक चांगले लेखकसुद्धा आहेत. त्यांच्या संवादांना धार असते.

या सिनेमाची संगीताची बाजू कमजोर आहे. 'गँगस्टर' 'साहिब'ला मारण्यासाठी कोणत्याही स्तराला जायला तयार आहे. साहिबला गँगस्टरचे ज्या स्त्रीवर प्रेम आहे (सोहा) तिच्याबरोबरच जबरदस्तीने लग्न करायचे आहे. ही स्त्री चांगल्या कुटुंबाशी जुळलेली आहे.

भारतात बहुपत्नीत्व बेकायदेशीर आहे. मात्र जर तुम्ही राजा असाल तर गोष्ट निराळी आहे. सिनेमाचे शीर्षक अबरार अल्वी यांच्या 'साहिब बीवी और गुलाम'पासून प्रेरित आहे.

या सिनेमात दाखवले गेलेले जमीनदार हास्यास्पद आहेत. त्यामुळे कधीकधी वाटतं की कॉमेडी आणि ट्रॅजेडी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विशेष म्हणजे हा सिनेमा ही गोष्ट खरी असल्याचं सिद्ध करतो.

(लेखक प्रख्यात चित्रपट समीक्षक आहेत.)