आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: सांगतो ऐका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या राजकीय गदारोळात त्याला कंटेम्पररी व्हॅल्यूही आहे. मात्र, केवळ विषय चांगला असून चालत नाही. कथानक, पटकथा, व्यक्तिरेखा, कलावंत अशी भट्टीही जमावी लागते. सतीश राजवाडेंच्या दिग्दर्शनातील 'सांगतो ऐका' मध्ये ते फारसे झाले नाही. त्यामुळे कुणीही ऐकू नका, अशी स्थिती निर्माण होते.
कथा:
कोल्हापूरनजीकच्या कांबळवाडी गावातील मोहिनी (संस्कृती) या तमासगिरणीचा दारुड्या नवरा आंबट (सचिन) तमाशात बाहुल्यांचा वापर करून सर्वांचे मनोरंजन, प्रबोधन करत असतो. दोघांच्या वयात खूपच अंतर तरीही मुलाबाळांसह सुखाचा संसार सुरू असतो. एकदा गावचे पुढारी अण्णासाहेब यांच्या पुतळ्याच्या गळ्यात चपलांची माळ घातलेली आढळते. त्यावरून वाद होतो. २४ तासांत आरोपीला हजर करू, अन्यथा गाढवावरून धिंड काढा, असे पोलिस अधिकारी खरडे बोलून जातो. मग स्वत:ची धिंड वाचवण्यासाठी आंबटला आरोपी केले जाते. आंबटचा मुलगा त्याला हीरो मानत असतो. तो बापाला भावनिक हाक घालतो. मग आंबट संपूर्ण प्रकरणाला कलाटणी देत राजकारणी भावांकडून अनेक योजना राबवून घेत गावाचा विकास करतो. पण तो आरोपातून निर्दोष मुक्त होतो का, हे चित्रपटात पाहणे योग्य ठरेल.
अभिनय:
सचिनचा तोंडवळा, संवादशैली शहरी आहे. त्याला कांबळवाडीतील आंबटच्या रूपात पाहणे खूपच कठीण जाते. भाऊ कदम आणि वैभव मांगले आणि मिलिंद शिंदे मात्र बहारदार. दोघांचे टायमिंग धमाल उडवून जाते.

संगीतः
'फूबाई फू फुगडी फू, दिसतोस भारी अरे मतदारा तू', हे गीत निवडणुकीच्या धुरळ्यात चालून जाणारे आहे.