आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: तमंचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन गुन्हेगारांना एकमेकांवर प्रेम झाले तर काय होईल? जरा विचार करा. दोघांची डेटींग बँकेची चोरी असेल. दोघे भविष्याचे प्लॅनिंग करताना ड्रग सप्लायसारख्या मोठ्या गुन्ह्यांविषयी विचार करतात. तसे पाहता, 'तमंचे' बॉलिवूड मसाला सिनेमांप्रमाणे नाहीये.
एक चांगली कथा असूनदेखील सिनेमात अनेक गोंधळ उडाले आहेत. सिनेमांत मुन्नचे पात्र साकारणारा निखिल आणि बाबूच्या भूमिकेत दिसणारी रिचा चड्ढा यांच्यातील प्रेमकथा या सिनेमात मांडण्यात आली आहे. सिनेमाचे दिग्दर्शन नवनीत बहल यांनी केले आहे. सिनेमा कधी-कधी कंटाळळवाणासुध्दा वाटतो.
रिचा चड्ढा आणि निखिल द्विवेदी यांच्यातील केमिस्ट्री
सिनेमाचे पात्र बाबू आणि मुन्ना यांच्यातील एक अनोखी केमिस्ट्री सिनेमात दाखवली आहे. बाबू दिल्लीची एक ड्रग डिलर आहे आणि मुन्ना छोट्या गावातील एक किडनॅपर आहे. रिचा चड्ढा
पहिल्याच सिनेमात एका गुन्हेगाराची भूमिका साकारत आहे. निखिलला हीरोच्या रुपात पचवणे कठिण आहे. सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये रिचा खलनायकाला सांगते, निखिल किती स्मार्ट आहे. सिनेमात यांच्यातील काही संवाद नकोसे वाटतात.
का आहे सिनेमाची कहानी?
पोलिसांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी बाबू आणि मुन्ना धावत असताना एकमेकांना भेटतात. दोघे प्रेमात पडतात. परंतु बाबूचा पाठलाग करताना मुन्नाला माहिते होते, की बाबू ड्रग डिलिंग रॅकेटमध्ये सामील आहे. त्यानंतर बाबूच्या पार्टनर आणि गँगच्या लीडरला मुन्ना प्राभावित करतो आणि त्यांच्यात सामील होतो. दोघांच्या प्रेमाची चाहूल गँगच्या लीडरला लागते, तेव्हा त्यांच्या प्रेमकथेत टि्वस्ट येतो.
का पाहावा तमंचे?
सिनेमात अनेक कमतरता आहेत. तसेच, काही भागांत विनाकारण सीन टाकण्यात आले आहे. तरीदेखील तमंचे एकदा बघावा असा आहे. जर तुम्ही या सिनेमात 'बँग बँग'सारख्या अॅक्शन आणि 'हैदर'सारखी कथा असल्याचा समजत असाल तर, तुम्ही दुसरा सिनेमा पाहू शकता. तुम्ही जर क्राइम सिनेमाचे शौकीन असाल तर तमंचेला जाऊ शकता.