आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: 'द अमेजिंग स्पायडरमॅन 2'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'द अमेजिंग स्पायडरमॅन 2'मध्ये एंड्र्यू गारफिल्ड यांनी पीटर पार्करची भूमिका साकारली. ज्या प्रेक्षकांनी या सिनेमाचा पहिला पार्ट पाहिला नाही, त्यांनी या फस्ट पार्टची स्टोरी जाणून घेणे गरजेचे आहे.

ही होती 'द अमेजिंग स्पायडरमॅन'ची कहाणी -
'द अमेजिंग स्पायडरमॅन' या सिनेमात पीटरचे बालपण दाखवण्यात आले होते. त्याचे वडील सायंटिस्ट आहे. त्यांच्याकडे एक गुपित आहे. ते बालपणी पीटरला त्यांच्या एका मित्राकडे सोडून जातात. पीटरचे बालपण आईवडिलांच्या प्रेमाशिवाय जातं. तो खूप साधा-सरळ तरुण असतो.
मोठा झाल्यानंतर जेव्हा तो हायस्कूलमध्ये जातो, तेव्हा त्याचे मित्र त्याची खिल्ली उडवतात. मात्र वर्गातील ग्वेन स्टेसी नावाची मुलगी त्याला पसंत करते.
एकेदिवशी पीटर आपल्या वडिलांच्या मित्राच्या लॅबमध्ये जातो. तेथे एक कोळी (स्पायडर) त्याचा चावा घेते. त्यानंतर पीटरच्या आश्चर्यकारक शारीरिक बदल होऊ लागतात. तो याविषयी कुणाकडेही वाच्यता करत नाही. तो एवढा शक्तिशाली होतो, की त्यावर त्याचाही विश्वास बसत नाही. मात्र तो आपल्या शक्तिचा चुकीचा वापर करत नाही. उलट अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करण्याचे तो ठरवतो.
ही आहे 'द अमेजिंग स्पायडरमॅन 2'ची कहाणी -
पहिल्या भागापासून सिनेमाची स्टोरी पुढे सरकते. स्पायडरमॅन बनून पीटर लोकांची मदत करतो. मात्र खासगी आयुष्यात त्याला एक खंतसुद्धा आहे. त्याचे वडील अचानक गायब झाले आहेत. मात्र तो त्यांना शोधण्यासाठी वेळ काढू शकत नाहीये. कारण त्याच्यावर देशाची जबाबदारी आहे.
याशिवाय तो ग्वेन (एमा स्टोन) सोबतही वेळ घालवू शकत नाही. तो सतत कोणत्या तरी अडचणीचा सामना करताना दिसतो.
पीटरला एका व्हिलनसोबत लढताना दाखवण्यात आले आहे. तेथेच कथेला रंजक वळण प्राप्त होतं. सिनेमात पात्रांची भडीमार आहे, त्यामुळे कोण कधी येतं आणि कधी कोण जातं, हे कळत नाही. या पार्टमध्ये पीटरच्या आईवडीलांचे रहस्य उघड होतं.
का बघावा हा सिनेमा?
या सिनेमात कमालीचे स्पेशल इफेक्ट्स आणि साउंड इफेक्ट्स आहेत. अॅक्शन सीन्ससुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चित्रीत कणर्‍यात आले आहेत. या कथेत थोडा इमोशनल टचसुद्धा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एंड्र्यू आणि एमा यांनी सिनेमात उत्कृष्ट अभिनय केला आहे.
मार्क वेब दिग्दर्शिक हा सिनेमा नक्कीच लहान मुलांना पसंत पडेल असा आहे. या आठवड्यात बिग बजेट, बिग बॅनर बॉलिवूड सिनेमा रिलीज होत याचा फायदा 'द अमेजिंग स्पायडरमॅन 2'ला मिळणार आहे. स्पायडरमॅन सीरिजचे चाहते हा सिनेमा एकदा नक्की बघू शकतात.