आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: द शौकीन्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कहानी-
लाली (अनुपम खेर), केडी (अन्नू कपूर), आणि पिंकी (पियूष मिश्रा) हे तिघे मित्र आहेत. वयाने तिघेही वयस्कर आहेत. परंतु त्यांचे मन एखाद्या लहान निरागस मुलासारखे आहे. बाजार, गार्डन प्रत्येक ठिकाणी तिघे आपल्यापेक्षा कमी वयाच्या तरुणींचे निरिक्षण करतात. तरुणींना जेव्हा या तिघांच्या कृत्याची जाणीव होते, तेव्हा तिघे विचार करतात, की दिल्ली सोडून मॉरिशसला जायचे. मॉरिशसमध्ये तिघे अहाना (लीसा हेडन)च्या येथे भाड्याच्या घरात राहतात. अहाना खूप मनमोकळी असते. तिचे सुपरस्टार अक्षय कुमारला भेटण्याचे स्वप्न असते. अहाना लाली, केडी आणि पिंकीला तिच्या स्वप्नाविषयी सांगते. ती त्यांना म्हणते, कुणी जर तिची भेट अक्षय कुमारशी घालवून दिली तर ती त्याच्यासाठी काहीही करू शकते. येथूनच सिनेमा नवीन वळण घेतो. सिनेमात कॉमेडीचा तडका आणखी वाढत जातो. सिनेमात पुढे काय होते, हे पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये गेल्याशिवाय कळणार नाही. कारण कॉमेडी तुम्हाला पडद्यावरच दिसेल.
अभिनय-
अक्षय कुमार आणि लीसा हेडनसोबत इंडस्ट्रीचे तीन दिग्गज कलाकार सिनेमात आहेत. अक्षय कुमारविषयी सांगायचे झाले तर तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या परिक्षेस उरताना दिसतो. परंतु लीसाचा अभिनय काम पुढे ढकलण्यासारखा आहे. लीसाला जे पात्र दिले आहे, ते तिला शोभत नाही असेही म्हटले जाऊ शकते. तसेच, अनुपम खेर, अन्नू कपूर आणि पियूष मिश्रा यांनी पुन्हा एकदा सिध्द केले, की ते वयानेच नव्हे तर अभिनयानेसुध्दा दिग्गज आहेत.
दिग्दर्शन-
दिग्दर्शक अभिषेक शर्माने 'शौकीन' (1981)च्या आधारे 'द शौकीन' बनवला आहे. सिनेमात तसे पाहता कोणतीच विशिष्ट कथा नाहीये. परंतु त्याने पडद्यावर तीन वयोवृध्दांना शानदाररित्या सादर केले आहे. सिनेमा अधून-मधून कंटाळवाणा वाटतो. परंतु सिनेमातील कॉमेडी सीन्स त्याची भरपाई करतात. अभिषेकने सिनेमासाठी चांगले लोकेशन निवडले आहे.
संगीत
बॉलिवूड सिनेमांत सध्या यो यो हनी सिंहचे संगीत प्रसिध्द आहे. या सिनेमाची जशी थीम होती, त्यानुसार हनी सिंहसोबत हार्ड कौरस विक्रम नेगी आणि आर्को मुखर्जीने शानदार संगीत दिले आहे. सिनेमातील 'मै एल्कोहोलिक हू', 'तेरी मेहरबानी', 'आशिक मिजाज', 'इश्क कुत्ता है' हे गाणे रिलीजपूर्वीच चर्चेत आले होते.
का पाहावा?
अक्षय बॉलिवूडचा अशा स्टार्समध्ये सामील ज्यांच्या सिनेमात मनोरंजन खचखचून भरलेले असते. अर्थातच पैसा वसूल सिनेमे असतात. सिनेमा मनोरंजनला लक्षात ठेऊनच बनवल्या गेला आहे. 1981मध्ये आलेला 'शौकीन' तरुणाईने पाहिला नसेल तर 'द शौकीन' पाहू शकता.