आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'विश्वरूप\' म्हणजे कमल हसनची कमाल !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नीरज पांडेने 'अ वेनस्डे' नावाचा दहशतवादावर आधारित एक सिनेमा बनवला होता. या सिनेमाचा रिमेक तामिळमध्येही बनवण्यात आला आहे. या सिनेमात नसिरुद्दीन शाह यांनी अशा व्यक्तीची भूमिका साकारली होती, जो शहरातील बसेस बॉम्बस्फोटाने उडवण्याची धमकी देत असतो. त्याच्याशी चर्चा करणा-या पोलिस कमिशनरच्या भूमिकेत अभिनेते अनुपम खेर होते. तामिळ रिमेकमध्ये कमल हसन यांनी नसिरुद्दीन यांची भूमिका साकारली होती.
एका मुलाखतीदरम्यान अनुपम खेर यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की, त्यांची भूमिका कोणत्या अभिनेत्याने साकारायला हवी होती, यावर अनुपम यांनी उत्तर देताना म्हटले की, कमल हसन या दोन्ही भूमिका साकारत नाहीयेत का ? पाहिलंत कमल सरांची ख्याती किती आहे ती.

माझ्या मते, कमल हसन एकाच आयुष्यात जास्तीत जास्त भूमिका करता याव्या यासाठी स्वतःच सिनेमांची कथा लिहितात. स्वतः सिनेमा दिग्दर्शित करतात आणि स्वतः त्यात अभिनयसुद्धा करतात. आयुष्य फारच लहान असल्यामुळे ते एकाच सिनेमात अनेक भूमिका साकारत असतात. आपल्या मागील 'दशावतारम्' या सिनेमात कमल हसन यांनी तब्बल 13 भूमिका साकारल्या होत्या. त्यामध्ये अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्याही भूमिकेचा समावेश होता.

'विश्वरूप' ('विश्वरूपम' हा तामिळ सिनेमा हिंदीत 'विश्वरूप' या नावाने डब करण्यात आला आहे.) या सिनेमात ते सुंदर मुलींच्या घोळक्यात असलेल्या एका भरतनाट्यम डान्स-टीचरच्या भूमिकेतून आपल्यासमोर येतात. त्यांचे नाव विश्वनाथ आहे. त्यांचे लग्न एका सुपर-हॉट सायंटिस्टबरोबर झाले आहे. (विश्वनाथच्या पत्नीची भूमिका पूजा कुमारने साकारली आहे.) पूजाचा अभिनय खूप उत्कृष्ट झाला आहे, असे म्हणता येणार नाही. कदाचित या भूमिकेची गरज हीच असावी. बहुतेक विश्वनाथ गे आहे आणि त्यांच्या हालचाली स्त्रियांसारख्या आहेत.

जर तुम्ही अर्धवट सिनेमा बघितला तर या दोघांनी लग्न का केले असावे, याचा उलगडा तुम्हाला होणार नाही. विश्वनाथला स्वयंपाक करणे आणि आपल्या पत्नीची काळजी घेणे जास्त पसंत आहे. तर त्याची पत्नी मात्र केवळ ग्रीन कार्डसाठी त्याच्यासोबत आहे.

हळूहळू आपल्याला विश्वनाथचा उलगडा होत जातो. तो एक भारतीय मुस्लिम वसीम कश्मिरी आहे आणि अलकायदापेक्षा कमी नाहीये. वास्तविक पाहता तो एक किलिंग मशीन असून त्याच्यात अनेक गुण आहेत. त्याला उडतासुद्धा येतं. ही व्यक्ती एका मल्टीनॅशनल समूहाची मुजाहिद्दीन होती. त्याच्या समूहाला अरबांच्या वतीने पैसे पुरवले जात होते. पाकिस्तानसुद्धा त्याची मदत करत होता आणि एक अफगानी व्यक्ती त्याच्या मदतीला होता. (एक डोळा असलेल्या राहुल बोसने या भूमिकेत मार्लन ब्रांडोची आठवण करुन दिली.) तो त्याच्या गुफांच्या आजूबाजूला दहशतवाद्यांना प्रशिक्षण द्यायचा आणि लढाई लढायचा. हे ठिकाण एकेकाळी ओसामा बिन लादेनचा आशियाना म्हणून ओळखले जात होते. अफगानिस्तानच्या पहाडांवर ओसामा एकदा दिसलासुद्धा होता. मात्र कदाचित वसीम कश्मिरी त्याच्यापेक्षा जास्त इंट्रेस्टिंग पात्र आहे.

हा वसीम कश्मिरी आता तौफीक नावाने न्यूयॉर्कमध्ये राहतो. प्रेक्षकांना सिनेमा बघताना सगळे काही समजून न समजल्यासारखे वाटेल. प्रेक्षकांची बहुतेकदा अशी स्थिती निर्माण होते. ब-याचदा सिनेमा बघण्याची मजा कमी होऊ नये यासाठी प्रेक्षक जाणूनबूजूनसुद्धा न समजल्याचा प्रयत्न करतात.

कमल हसन या सिनेमात दहशतवादी, डान्स टीचर आणि अमेरिकेचा रहिवाशी अशा तीन भूमिकेत आहेत. सिनेमाची कथा वाळवंटातील कट्टरवादी आणि अमेरिकेत राहणा-या हिरोभोवती फिरत असते.

सिनेमात काही चांगले स्टंट्स आणि युद्धाची दृश्ये आहेत. या सिनेमात करण्यात आलेल्या स्पेशल इफेक्ट्सचा वापर फार कमी भारतीय सिनेमांमध्ये करण्यात आला आहे. सिनेमा संपता-संपता कथा बोअर होऊ लागते. मात्र काही उत्कृष्ट दृश्यांमुळे आपण त्याकडे कानाडोळा करु शकतो.

या सिनेमासाठी नक्कीच लेखक आणि दिग्दर्शकाचे अभिनंदन करायला हवे. आपल्या पाच दशकातील करिअरमध्ये कमल हसन तामिळ सिनेमाच्या मुख्य धारेतील केंद्रबिंदू ठरले आहेत. त्यांनी पुष्पक, चाची 420, अभय, सदमा, नायकन आणि अप्पू राजा या सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.

तर दुसरीकडे, त्यांचे समकालीन अभिनेते रजनीकांत यांनी नेहमीच सुपरस्टारसारख्या भूमिकांना पसंती दिली आहे. कमल हसन आणि रजनीकांत यांची तुलना बॉलिवूडच्या आमिर खान आणि सलमान खान यांच्याबरोबर केली जाऊ शकते.

सिनेमामध्ये सध्याच्या दहशतवादावर भाष्य करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण जग याचा सामना करतोय. तसे पाहता 'विश्वरूप' या विषयावर तयार झालेला पहिला किंवा शेवटचा सिनेमा नाहीये. हा सिनेमा दहशतवादाला नकारात्मक दृष्टिकोनातून सादर करतो का ? असा प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तर नक्कीच होय, असे आहे. तर मग काय हा सिनेमा मुस्लिमांच्या भावनांचा अनादर करतो? या विषयावर केवळ राजकारण करणारी व्यक्तीच असा विचार करु शकते. कारण हिंसा आणि रुढीवादाला कोणताही धर्म नसतो, हे प्रेक्षकांना ठाऊक आहे. हसन यांचा 'हे राम' हा सिनेमा महात्मा गांधींच्या हत्येवर आधारित होता. मात्र तो सिनेमासुद्धा हिंदुत्त्वाच्या धोरणावर हल्ला करत नाही.

हा संपूर्ण मनोरंजनात्मक सिनेमा आहे. हा सिनेमा जेम्स बॉन्ड आणि डाय हार्ड सीरिजच्या अमेरिकी सिनेमांचे देसी मिश्रण आहे. दिग्दर्शकाने या सिनेमाला हॉलिवूड टच देण्यासाठी काही अशा कलाकारांना घेतले आहे, जे एफबीआय एजंटचे रुप घेऊ शकतील.

सध्या देशात सुरु असलेल्या या सिनेमाचा वाद लक्षात घेऊन जर तुम्ही का सिनेमा बघितला, तर एकच प्रश्न मनात येईल तो म्हणजे, ''अरे एवढा वाद आणि विरोध करण्यासारखे या सिनेमात नेमके आहे तरी काय ?''

(लेखक प्रख्यात चित्रपट समीक्षक आहेत.)