आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MOVIE REVIEW : बिपाशाच्या \'आत्मा\'ने केली घोर निराशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेक्षकांच्या हालचालींवरुन त्यांना हा हॉरर सिनेमा घाबरवण्यात यशस्वी होतोय की नाही, याचा अंदाज आपण बांधू शकतो. हा सिनेमा उत्कृष्ट आहे की नाही, यामुळेही काही फरक पडत नाही. मात्र हा सिनेमा बघून प्रेक्षक नक्कीच हसतात. 2003 साली आलेला 'भूत' हा सिनेमा आठवा. कदाचित असे तर नाही, की दिग्दर्शक ज्या सिनेमाला हॉरर समजतयात तो प्रत्यक्षात विनोदी सिनेमा बनला.

मी ज्या थिएटरमध्ये हा सिनेमा बघितला (मी एका प्रेस प्रिव्ह्युमध्ये हा सिनेमा बघितला, येथे बरेच प्रेक्षक आले होते.) तिथे मला सतत प्रेक्षकांचे हसणे ऐकू येत होते. प्रेक्षक घाबरण्याऐवजी मस्त हसत होते.

भूत पडद्यावर असो किंवा नसो, मात्र तो प्रेक्षकांना घाबरवण्यात अयशस्वी ठरला हे नक्की. हं... पण भूत एकदा शाळेच्या शिक्षिकेला घाबरवण्यासाठी नक्की येतो, मात्र रात्रीच्या वेळी ही शिक्षिका एवढ्या मोठ्या शाळेत एकटीच का प्रश्नपत्रिका तपासत आहे, हे बघून आपल्याला नक्कीच आश्चर्य होते. माझ्या मते, तर शिक्षक हे काम सहसा आपल्या घरी करत असतात.

शिक्षिकेला आरशात भूत दिसतो. मिस्टर इंडियाप्रमाणे, आपण कधी कधी सिनेमातील या भुताला रेड लाईटमध्येसुद्धा बघू शकतो. तो फोनवर कॉल करु शकतो आणि स्वतःला कम्प्युटर स्क्रिनवरही चिकटवू शकतो. मात्र तरीदेखील त्याला नेमके काय करायचे आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. आयुष्यात प्रत्येक माणसाचे एक उद्दिष्ट असते, त्याप्रमाणे भूतांचेदेखील असावे.

या भूताची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारली आहे. पत्नीपासून घटस्फोट घेऊन तो आपल्या मुलीसमवेत वेगळा राहत होता. तेव्हा तो जिवंत होता आणि एक संशयी नवरा होता. उच्च मध्यमवर्गात सहसा अशाप्रकारचे नवरे आढळतात. अखेर त्याच्या अशा वागण्यामागे नेमके कारण काय, हे दिग्दर्शकाने स्पष्ट केलेले नाही. आता त्याचा मृत्यू झाला असताना तो आपल्या मुलीविषयी खूप जास्त पजेसिव झाला आहे.

त्याच्या पत्नीला (बिपाशा) वाईट स्वप्न पडतात. ती एकदा त्याला बाथरुममध्ये बघते, तितक्यात तिला तिच्या एका मैत्रीणीचा फोन येतो. ती मैत्रीण तिला म्हणते की, मी तुझ्या वाईट स्वप्नांविषयी विचार करत होते, झोपताना तू एखादा चाकू आपल्या उशीखाली ठेव, स्वप्न पडणार नाहीत. तितक्यात एक चाकू हवेत उडताना दिसतो. हे दृश्य पाहून प्रेक्षकांना नक्कीच कंटाळा आला असावा. त्यानंतर सिनेमात अनेक हत्या होतात. प्रत्येक हत्येची चौकशी करण्यासाठी पोलिस येतात, जे नेहमीच धीरगंभीर दिसतात. त्यांना बघून आपण हसतो. सिनेमात मनोवैज्ञानिक आणि आध्यात्मिक गुरुसुद्धा आहेत. गुरु एका दृश्यात हळू आवाजात म्हणतात की, मी हरिद्वारला जातोय, तेथे गुरुजींना या घटनेविषयी विचारेल. हे बघून आपल्या पुन्हा एकदा हसू फुटतं.


धार्मिक आणि हॉरर कथांचा एकमेकांशी सावलीसारखा संबंध असतो. अशा सिनेमांमध्ये आपण त्यावर विश्वासही ठेवतो. देशातील ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीचा संबंध एकदा तरी भूताबरोबर होते, हे आपण ऐकून आहोत. रामसे ब्रदर्स (वीराना, दो गज जमीन के नीचे, वगैरे...) ने अशा प्रकारच्या प्रेक्षकांसाठी अनेक लो-बजेट हॉरर सिनेमे बनवले आहे.
या सिनेमातील होम डेकोरेशन खूप सुंदररित्या करण्यात आले आहे. शिवाय याची सिनेमॅटोग्राफीसुद्धा उत्कृष्ट आहे. मात्र या सिनेमाचा मूड खूपच निरस आहे. एवढे तर निश्चित आहे की, हॉरर सिनेमा बघितल्याचा फिल हा सिनेमा बघून येत नाही.


1982 साली रिलीज झालेल्या 'पोल्टरग्रीस्ट' या सिनेमाला यांसारख्या सिनेमांचे जनक म्हटले जाऊ शकते.
मात्र अखेर त्या लहान मुलीचे काय झाले ? तिचे वडील या जगात नाही, यावर त्या लहान मुलीचा विश्वास नसतो. ती आपल्या मृत वडिलांबरोबर बोलत असते. अखेर सिनेमात रक्तरंजित घातपात घडतो. अखेर तिला आपल्या आजूबाजूला फक्त मृतदेह दिसतात.

एकंदरीतच या 'आत्मा'ने प्रेक्षकांची निराशा केली हेच खरे.