आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'हिम्मतवाला\'.... जुन्या बाटलीत नवी दारु

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हा सिनेमा 1980 च्या दशकात रिलीज झालेल्या 'हिम्मतवाला' या सिनेमावर आधारित नसून ऐंशीच्या दशकातील काळ या सिनेमात उभा करण्यात आला आहे. त्यामुळे या सिनेमाला विचित्र पीरिएड फिल्म म्हटले जाऊ शकते.

अधिकाधिक रिमेक्स सिनेमांमध्ये उदाहरणार्थ, फरहान अख्तरचा 'डॉन', करण मल्होत्राचा 'अग्निपथ', इतकेच कशाला राम गोपाल वर्माचा 'आग', अशा सिनेमांमध्ये दिग्दर्शकाने मुळ कथा आणि व्यक्तिरेखांना कायम ठेवले होते. मात्र या सिनेमांना त्याने स्वतःचा टच दिला होता. त्यामुळे अशा सिनेमांना नक्कल म्हणण्याऐवजी रिमेक म्हटले जाते.

काही सिनेमे जुन्या कालखंडात तयार केले जातात. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास फराह खानचा 'ओम शांति ओम' किंवा मिलन लुथरियाचा 'द डर्टी पिक्चर'. या दोन्ही सिनेमांमध्ये जुना काळ उभा करण्यात आला होता. त्याकाळातील प्रेक्षक हे सिनेमे बघून स्मित हास्य करतात आणि या सिनेमांची मजा लुटतात. त्यामुळे अजय देवगणच्या 'हिम्मतवाला' या सिनेमाला जर 1983 सालीच जितेंद्रच्या 'हिम्मतवाला'बरोबर रिलीज केले असते तर दोन्ही सिनेमांना मिळणारा रिस्पॉन्स सारखाच असता.

अंतर फक्त इतकेच आहे की, या 'हिम्मतवाला'मध्ये रवीची भूमिका अजय देवगणने साकारली आहे, तर हिरोइनच्या हातात हंटर असून ती आपल्या ड्रायव्हरवर हंटरचा उपयोग करुन त्याला स्टेशनपर्यंत घेऊन येते.
'आय हेट गरीब्स', ती वारंवार म्हणत असते. मात्र कधी ती गरीबांच्या प्रेमात पडते, हे तिचे तिलाही कळत नाही. गरीब लोकांसाठी ती आपल्या वडिलांनाही उद्धवस्त करायला मागेपुढे बघत नाही.

ऐंशीच्या दशकात बनणा-या मेनस्ट्रीम सिनेमांची पार्श्वभूमी अगदी साधी-सरळ होती. त्याकाळातील सिनेमे भेळपूरीसारखे असायचे. इमोशन, ड्रामा, रोमान्स, अ‍ॅक्शन, हे सगळे काही त्याकाळातील सिनेमांमध्ये बघायला मिळत होते. त्याकाळातील निर्मात्यांनासुद्धा असे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतील हे ठाऊक असायचे.
निश्चितच, प्रेक्षकांनाही यावर काही आक्षेप नसायचा. यामध्येही काही निर्माते दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील असायचे. हिंदी भाषेवर त्यांचे प्रभूत्व नव्हते. त्यामुळे 'ताथैय्या ताथैय्या' आणि 'ताकि-ताकि' असे शब्द त्याकाळी हिंदी गाण्यात वापरले गेले. कॅमेरासुद्धा हिरोइनच्या नाजूक कमरेभोवती फिरायचा.

आनंदाची गोष्ट म्हणजे या सिनेमात असे काहीही घडत नाही. मात्र 1983 साली रिलीज झालेल्या 'हिम्मतवाला'मध्ये सामाजिक बांधिलकी दाखवण्यात आली होती. जीतेंद्र हीरो असलेल्या 'हिम्मतवाला'मध्ये तो पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गावक-यांना एकत्रित आणतो. त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घ्यायचा आहे. त्याच्या आई आणि बहिणीला गावाबाहेर काढण्यात येते. श्रीमंत सरपंच, जो गावातील ठाकूर असून त्याची हाजीहाजी करणारा त्याचा एक चमचासुद्धा आहे. सरपंचाची हाजीहाजी करणा-याचा मुलगा रवीच्या बहिणीबरोबर लग्न करतो. तिला त्रास देतो. मग व्हिलन आणि हीरोमध्ये संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळतो. नशीब एवढेच की, ''जब तक औरत पर होगा जुल्‍म, तब तक इंसान बनेगा हिम्‍मतवाला'', असे संवाद रवीच्या तोंडून बाहेर पडत नाहीत.

तसे पाहता हिम्मतवाला ऐंशीच्या दशकातील हिट सिनेमा होता. त्याकाळात घराघरात फक्त दुरदर्शन हे एकमेव माध्यम होते. त्यामुळे लोक मोठ्या पडद्यावरच सिनेमा बघून आनंदित होत होते. त्यामुळे माझ्या मते, मोजक्याच लोकांना हा सिनेमा लक्षात असावा. याच कारणामुळे कांती शाहचा सी ग्रेड 'गुंडा' (1994) हा सिनेमा इंटरनेटवर कल्ट सिनेमा म्हणून ओळखला जातो. हा सिनेमादेखील काही अंशी याच पार्श्वभूमीवर बवनवण्यात आला आहे. बहिणीचा भाऊ आणि आईचा मुलगा 'हिम्मतवाला' आहे.

या सिनेमात महेश मांजरेकरांनी व्हिलनची भूमिका साकारली आहे. ही भूमिका मोहन जोशी यांना जास्त शोभून दिसली असती. त्याची हाजीहाजी करणा-याची भूमिका परेश रावल यांनी साकारली आहे. जे कादर खानची नक्कल करताना दिसतात. त्यामुळे हा सिनेमा नेमक्या कोणत्या प्रकारच्या प्रेक्षकांसाठी बनवण्यात आला हे आपल्या लगेच लक्षात येतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर शंभर कोटींपेक्षा जास्त कमाई करेल, अशीही आशा व्यक्त केली जाऊ शकते.

सिनेमातील हीरो गुजराती, बंगाली, मराठी या भाषा बोलतो. जेणेकरुन या सगळ्या भागांतील प्रेक्षकांना तो आकर्षित करु शकेल, मात्र थिएटरमध्ये बसलेले प्रेक्षक हा सिनेमा लवकरात लवकर संपण्याची वाट बघत असतात. हा सिनेमा बघताना प्रेक्षक 'दी एण्ड'ची पाटी लागण्याची वाट बघतात. अखेर सिनेमा संपतो आणि शेवटी 'इट्स अ साजिद खान एन्टरटेनर' असे लिहून येतं. खरे सांगायचे झाल्यास, दिग्दर्शकच या सिनेमाला सिनेमा म्हणत नाही.