आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOVIE REVIEW: \'अच्छे दिन...\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर सगळ्यांना हे सर्व काही एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे वाटत आहे. एखाद्या चित्रपटाच्या नायकाप्रमाणे त्यांचे व्यक्तीमत्त्व सगळ्यांच्या डोळ्यात भरले. त्यामुळ खरंच हा चित्रपट असता तर त्यात कोणकोणते पात्र असते असा विचार आमच्या मनात आला. मग कोणते सीन असतील...डायलॉग कोणाचे असतील... दिग्दर्शक कोण असेल... आम्ही काही विचार केला आहे... तुम्हीही यात आमची मदत करू शकता... चला तर मग सुरुवात करुया...
मुव्ही रिव्ह्यू : अच्छे दिन
स्टारकास्ट : नरेंद्र मोदी (मेन लीड नमोच्या भूमिकेत)
किरण खेर : नमोंची आई
मनोज तिवारी : लहान भाऊ
हेमा मालिनी : बहिण
काका :विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा
आजोबा : अमिताभ बच्चन (स्पेशल अपिअरंस)
मित्र : रजनिकांत (स्पेशल अपिअरंस)
दिग्दर्शक : राजनाथ सिंह
प्रोडक्शन बॅनर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
क्रिटिक्स चॉइस रेटिंग: 4/5
पॉप्युलर चॉइस रेटिंग: 4.5/5
डायलॉग/संगीत - मोदी-अमित शाह, सॅम बलसारा(मेडिसन), पियुष पांडे(ओ एन एम)
स्क्रिप्ट- आरएसएस-भाजपा कोअर कमेटी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बॅनरखाली भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला 'अच्छे दिन' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्ल आहे. देशभरातील सुमारे 543 स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. त्यापैकी सुमारे 336 स्क्रीन्सवर जोरदार प्रतिसाद मिळाला. चित्रपटाचे जवळपास सर्व शो हाऊसफुल्ल होते.
चित्रपट 'स्वबळावर' हिट होत आहे, असे म्हणणेही चुकीचे ठरणार नाही. चित्रपटात 'नमो' या मुख्य भूमिकेत आहेत नरेंद्र मोदी. नायक म्हणून त्यांच्यासाठी या चित्रपट विशेष महत्त्वाचा आहे. कारण आतपर्यंत त्यांना केवळ त्यांच्या भागांत ओळखले जात होते. प्रथमच त्यांना एवढ्या प्रमाणावर लाँच करण्यात आले. 13 वर्षांच्या स्ट्रगलनंतर त्यांना हा ब्रेक मिळाला.

चित्रपटात ते देशाच्या नव्या पंतप्रधानाच्या भूमिकेत आहेत. आपल्या वेगळ्या शैलीसाठी ते ओळखले जाता. तसेच एक कडक प्रशासक अशी त्यांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. बॉलीवूडच्या अनेक प्रसिद्ध चेह-यांच्या उपस्थितीमुळे या चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे.

उत्तम कास्टिंग
देशाच्या कान्या कोप-यात पोहोचता यावे म्हणून निर्मात्यांनी फार विचार करून कास्टिंग केले आहे. चित्रपटात सर्व पात्र वेगळ्या भूमिकांद्वारे सगळ्यांचे मनोरंजन करणार आहेत. नमो यांच्या आईच्या भूमिकेत किरण खेर आहेत. कारण आजघडीला तरी त्यांच्यासारखी आई बॉलीवूडमध्ये नाही. नमोंच्या लहान भावाच्या भूमिकेत भोजपुरी गायक व अभिनेते मनोज तिवारी आहेत. त्यांनी आजवर अनेक भुमिका केल्या असल्या तरी या भुमिकेत वेगळे वजन असण्याची शक्यता आहे. तसेही पंतप्रधानाच्या लहान भावाची भूमिका म्हणजे काही कमी नाही. पण मनोज केवळ गाण्यांवर उड्या मारतात की खरंच काही करून दाखवतात हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.
नमोंच्या बहिणीच्या भूमिकेत आहेत ड्रीमगर्ल हेमा मालिनी. हेमाही नुकताच विजय मिळवलेल्या राजकारण्याच्या भूमिकेत आहेत. पण चित्रपटाचे यूएसपी म्हणजे स्पेशल अपिअरेंसमध्ये असलेले बिग बी आणि रजनिकांत आहेत. नमोंचे मित्र असलेले हे दोघे मोठे कलाकारही आहेतच. त्यांचे सीन खास भागासाठी राखून ठेवले आहेत.
अमिताभ यांचे नमोबरोबर जुने नाते आहे. त्यांनी आधीही बरोबर चित्रपट केले आहेत. तसेच मोजके चित्रपट करणारे रजनिकांतही लगेचच मोदींबरोबर काम करायला तयार झाले. चित्रपटात नमोंच्या काकाच्या भूमिकेत आहेत प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा.

हिरोला टक्कर देतील हे व्हीलन
प्रत्येक हिरोला आव्हान देण्यासाठी चित्रपटात व्हीलन हा असतोच. या चित्रपटातही एक नव्हे तर अनेक व्हीलन आहेत. त्यांना नमो यांचे पंतप्रधान बनने मान्य नाही. महेश भट्ट, कमाल खान, स्वरा भास्कर आता आणखी नावे सांगणार नाही. त्यासाठी तुम्हाला चित्रपट पहावा लागेल.

पुढे पहा... चित्रपटातील काही दृश्ये...