आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOVIE REVIEW : \'ओ तेरी\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'ओ तेरी' हा सिनेमा सलमान खानचे भावोजी अतुल अग्निहोत्रीचा सिनेमा आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शकाला एका चांगल्या कथेला योग्य न्याय देता आलेला नाही, असेच सिनेमा बघून जाणवते. या सिनेमात प्रत्येक गोष्टीत अतिशयोक्तीपणा दाखवण्यात आलेला आहे.
'ओ तेरी' सिनेमासाठी सध्याचा काळ योग्य नाहीये.कारण निर्मात्याने देशातील वातावरण लक्षात घ्यायला हवे होते. देशातील येणा-या निवडणूकीचा काळ लक्षात घेऊन सिनेमा रिलीज करायला हवा होता. एकाच वेळी सर्व घोटाळ्यांना सिनेमात सामील करण्याच्या प्रयत्नात दिग्दर्शक उमेश बिष्टकडून कथानक भरकटत गेले आहे. यातील काही प्रसंग कधी-कधी नकोसे वाटतात.
सिनेमाची कथा बनवाबनवीची आणि हसवणारी आहे. परंतु सिनेमातील मुख्य पात्रांचा अभिनय आणि वर्तणूक पचनी पडत नाही. विशेष म्हणजे ते जेव्हा विनोदी अभिनयातून गंभीर अभिनयाकडे वळतात, तेव्हा त्यांचा अभिनय पूर्णत: फिका वाटतो. एका पॉइंटनंतर सिनेमाचा मुख्य नायक पीपी (पुलकित सम्राट) आणि एड्स (बिलाल अमरोही) आता काय नवीन विचित्र वर्तणूक करणार, याची अंदाज आपण बांधू लागतो.
कॉमेनवेल्थ घोटाळ्यावर आधारित आहे सिनेमा?
सिनेमाची पटकथा कोणत्याही घोटाळ्यावर आधारित नसल्याचा आणि सिनेमातील पात्रांचा वास्तविक कुणाशीही संबंध नसल्याचा दावा निर्माते करू शकतात. परंतु सिनेमात प्रत्यक्षात घडलेल्या घोटाळ्यांची खिचडी करण्यात आली आहे. नीरा राडिया टेप कांडपासून ते कॉमनवेल्थपर्यंत प्रत्येक घोटाळा सिनेमात दिसतो.
हा एक देशभक्तीवरील सिनेमा आहे?
दिग्दर्शकाने सिनेमाच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक नागरिकाने देशाच्या कल्याणाचा विचार करायला हवा हा संदेश सिनेमाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. थिएटरच्या बाहेर पडल्यानंतर आपल्या डोक्यात फक्त गोंधळ उडतो. बाकी काहीच नाही.
सलमान ज्या सिनेमाशी जोडला जातो ,तो सिनेमा बघण्यासाठी थिएटरमध्ये डोके घेऊन जाण्याची गरज नसते. सिनेमा बघितल्यानंतर आपल्याला जास्त विचार करावा लागत नाही. हे सुत्र सर्वांनाच ठाऊक आहे.
लुलिया वंटूरचे आयटम नंबर का?
सिनेमात सलमान खानची खास मैत्रीण लुलिया वंटूरचे आयटम साँग बघायला मिळते. परंतु तिच्या आयटम नंबरची सिनेमात काय गरज होती, हे फक्त सिनेमाचे निर्माता, दिग्दर्शक आणि सलमानच सांगू शकेल. एवढेच नाही तर, सिनेमात काही गाणी जबरदस्ती आणल्यासारखी वाटतात. त्यामुळे सिनेमा ताणून धरल्यासारखा वाटतो.
हा सिनेमा पाहावा की नाही?
'ओ तेरी' सिनेमा बघण्यासाठी तुम्हाला पैसे आणि वेळ खर्च करण्याची गरज नाहीये. कारण हा सिनेमा तुमचे अजिबात मनोरंजन करू शकणार नाही. सोबतच, तुम्ही हा सिनेमा बघून बोअर होण्यापेक्षा दुस-या सिनेमाची निवड करून एन्जॉय करू शकता.