आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंटाळवाणी \'जयन्ताभाई की लव्ह स्टोरी\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवेक ओबरॉयची प्रमुख भूमिका असलेला 'जयन्ताभाई की लव्ह स्टोरी' हा सिनेमा अगदी नवीन बाटलीतील जुन्या दारुप्रमाणे आहे. मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित हा सिनेमा जयन्ता नावाच्या अगदी साध्या गँगस्टरची प्रेमकहाणी आहे. तो आपल्या शेजारी राहणा-या सिमरन नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. सिमरनची भूमिका नेहा शर्माने साकारली आहे.

सिमरन एक सुशिक्षित मुलगी असून मंदीच्या काळात नवीन नोकरीच्या शोधात आहे. सिमरन कशाप्रकारे गँगस्टर जयन्ताच्या प्रेमात पडते, ही या सिनेमाची कथा आहे. या सिनेमाचा प्लॉट खूपच बोअरिंग आहे. यात काहीही नाविन्य नाहीये. या सिनेमाची आणखी एक कंटाळवाणी गोष्ट म्हणजे सिनेमाचा स्क्रिनप्ले.

जयन्ताचे वारंवार सिमरनच्या बचावासाठी येणे हे नव्वदच्या दशकातील सिनेमांची आठवण करुन देते. नव्वदच्या दशकातील सिनेमांमध्ये हिरो हिरोईनला इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडत नव्हते. अगदी तसेच या सिनेमात आहे.
सिनेमात सातत्य नाहीये. एका दृश्यात विवेक क्लिन शेव्हमध्ये दिसतो, तर अगदी दुस-याच दृश्यात त्याच्या चेह-यावर वाढलेली दाढी दिसते. नेहा शर्मा आकर्षक दिसली आहे. मात्र काही ठिकाणी परिधान केलेल्या ड्रेसमुळे तिचा लूक विचित्र वाटतो. असे असले तरीदेखील विवेक ओबरॉयने चांगला अभिनय केला आहे. तर नेहाचेही काम कौतुकास्पद आहे.
एकंदरीतच 'जयंताभाई की लव्ह स्टोरी' खूप खास जुळून आलेली नाही.