आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIRST SHOW FIRST REACTION: सत्याग्रह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रकाश झा यांनी त्यांचा 'सत्याग्रह' हा सिनेमा अण्णा हजारेंच्या आंदोलनावर आधारित नसल्याचे अनेकदा म्हटले आहे. मात्र आज रिलीज झालेल्या या सिनेमाची कहाणी भ्रष्ट सिस्टीमच्या विरोधात भारताचे हीरो अण्णा हजारेंनी सुरु केलेल्या आंदोलनावरच आधारित आहे. त्याचे कारण म्हणजे अमिताभ उर्फ दादूजी उर्फ द्वारका आनंद यांचे विचार आणि व्यक्तिमत्त्व अगदी अण्णा हजारेंसारखेच असल्याचे स्पष्ट संकेत देतात. दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या या सिनेमात दादूरजी उर्फ द्वारका आनंद (अमिताभ बच्चन) अण्णा हजारेंप्रमाणेच गांधीवादी विचारसरणीवर चालतात. खासगी आयुष्यात समाजसेवक अण्णा हजारेंनी सुरु केलेले भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलन पडद्यावर सादर केले आहे दिग्दर्शक प्रकाश झा यांनी. अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या प्रभाव एवढा दिसला, की लोक घरातून बाहेर पडून अण्णांच्या समर्थनासाठी रस्त्यांवर आले होते. 24 तास न्यूज चॅनलवर अण्णांची चर्चा झाली.

अण्णा हजारे यांनी लोकपाल बिलाची मागणी केली होती, तर पडद्यावर दादूजी यांनासुद्धा सत्याग्रहाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराखाली दबलेल्या लाखो फाईल्सवर चढलेली धूळ पुसून काढायची आहे. 2011 मध्ये अण्णा हजारे यांनी सिस्टम सुधारण्यासाठी जी लढाई सुरु केली, देशासाठी काहीही करण्याची जी तयारी वयाची 70 पार केलेल्या अण्णांमध्ये दिसली, तोच जोश, तीच उत्कटता आणि विचार बिग बींनी सत्याग्रहमध्ये साकारलेल्या भूमिकेत दिसले. अण्णांप्रमाणेच त्यांनी उपोषणही केले, स्वतःला कमजोर होऊ दिले नाही. म्हणजेच देशाच्या हीरोची भूमिका बच्चन साहेबांनी केवळ साकारलीच नाही तर ती जिवंतही केली. कदाचित म्हणूनच बिग बींना बॉलिवूडचा शहनशाह म्हटले जाते.

अमिताभ यांच्यानंतर सिनेमात महत्त्वाची भूमिका म्हणजेच राजकारणी बलराम सिंहची भूमिका साकारली आहे, ती मनोज बाजपेयीने. त्याचे जितके कौतुक करावे ते कमीच आहे. तसे पाहता, अशा प्रकारची गंभीर, इंटेस आणि ग्रेशेडची भूमिका मनोज बाजपेयीने पहिल्यांदाच साकारलेली नाही. मात्र राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मनोज बाजपेयीशिवाय हा सिनेमा तयार करणे कठीण होते. तर मग राजकारणावर आधारित सिनेमे बनण्यात हातखंडा असलेल्या दिग्दर्शक प्रकाश झांनी 'सत्याग्रह'च्या कथेला योग्य न्याय दिला आहे का ?

ही कहाणी आहे अम्बिकापूरची, जिथे 70 वर्षीय द्वारका आनंद त्यांचा मुलगा अखिलेश आनंदबरोबर राहतात. द्वारका आनंद तेथील शाळेतील मुख्याध्यापक होते. मात्र आत्ताही ते मुलांना शिकवण्याबरोबरच सामाजिक कार्यही करतात. आपल्या तत्त्वांशी ठाम असेलेले, प्रत्येकक्षणी देशाच्या उन्नतीविषयी विचार करणे हा त्यांचा धर्म आहे. ते केवळ न्यायाच्या मार्गावर चालत नाही तर अन्यायाविरोधात आवाजही उठवतात.

वडिलांप्रमाणेच त्यांचा कर्तबगार इंजिनिअर मुलगा अखिलेश सरकारसाठी चांगले रस्ते बनवू इच्छितो, शिवाय रिटायर्मेंटनंतर जिल्ह्यातील मुलांसाठी शाळा सुरु करण्याचा त्याचा मानस आहे.

या सिनेमात अमृता राव अखिलेशच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. 2011 नंतर अमृता मोठ्या पडद्यावर दिसत आहे. अमृता राव अर्थातच सुमित्रा केवळ आपल्या पतीची काळजीच घेत नाही, तर आपल्या सास-यांचा द्वारका आनंद यांचा सन्मान करत त्यांच्या विचारांचा मान ठेवते. मात्र कहाणीत ट्विस्ट येतो, जेव्हा अखिलेशचा अपघाती मृत्यू होतो आणि अखिलेशचा बेस्ट फ्रेंड मानव उर्फ अजय देवगण आपल्या मित्राच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी अम्बिकापूरमध्ये येतो.

तसे पाहता मानवला भरपूर पैसा कमवायचा आहे आणि यशोशिखर गाठायचे आहे. मात्र अखिलेशच्या अकाली मृत्यूने अम्बिकापूरमध्ये केवळ नवीन अध्यायच रचला जात नाही, तर मानवचे आयुष्यही बदलून जातं. असं तेव्हा होतं जेव्हा द्वारका आनंद सगळ्यांसमोर कलेक्टरच्या कानशिलात लगावतात. याचे कारण त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यांना मिळणा-या 25 लाखांना होत असेलला उशीर नव्हे तर त्यांची सून सुमित्रा भ्रष्ट सरकारी नोकरांना फाईल पास करण्यासाठी घूस देत नाही.

कलेक्टरला मारहाण केल्याप्रकरणी द्वारका आनंद यांना तुरुंगात जावं लागते. त्यांना तुरुंगाबाहेर काढण्याच्या मानवचे प्रयत्न इतके मोठे होतात, की त्यामध्ये सामान्य लोकही सहभागी होतात. मग ही लढाई केवळ एका जणाची नव्हे तर संपूर्ण देशभरातील आमआदमीची लढाई बनते.

जनतेचा आक्रोश रस्त्यांवर दिसू लागतो. प्रत्येक गल्लीत, रस्तावर जन सत्याग्रहची घोषणा देताना आम आदमी दिसतो. द्वारका आनंद यांचा शिष्य ज्याचे शालेय दिवसांपासूनच लक्ष गुंडेगिरीत होते, तो आता मोठा झाल्यानंतर राजकारणात जाऊ इच्छितो, मात्र नंतर तोसुद्धा सत्याची साथ देण्यासाठी दादूजीबरोबर सहभागी होतो. अर्जुन रामपालचे नाव सिनेमातही अर्जुनच आहे.

ज्याप्रकारे अण्णा हजारेंचे आंदोलन वकिल प्रशांत भूषणशिवाय अधुरे आहे, त्याचप्रमामे दादूजीची लढाई वकिल इंद्रजीतशिवाय अधुरी आहे. त्यांचा चेहरा हुबेहुब प्रशांत भूषणशी मिळताजुळता आहे.

सिनेमात करीना कपूरने यासमीन अहमद नावाच्या पत्रकाराची भूमिका साकारली आहे. सिनेमाच्या फस्ट हाफ लोकांना खिळवून ठेवतो, मात्र इंटर्वलनंतरच्या पाच मिनिटांतच प्रेक्षकांचा सिनेमा बघण्याचा इंटरेस्ट कमी होऊ लागतो. सेकंड हाफमध्ये दादूजींचा मृत्यू, रक्तपात, हिंदा, दंगा, सिनेमाला ट्रॅकपासून दूर घेऊन जातो.

सिनेमात स्टार व्हॅल्यू कमी नाही. सगळ्याच कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. मात्र सैल पटकथेमुळे प्रकाश झा या सर्व कलाकारांना योग्य न्याय देऊ शकले नाही. म्हणजेच सिनेमाची कथा अजून चांगल्या पद्धतीने मांडता येऊ शकली असती. सामान्यांचे महत्त्व आणि दाखवण्यात आलेल्या आंदोलनातील जोश आणखी चांगल्याप्रकारे खुलवता येऊ शकला असता.

सिनेमाचा शेवट निराश करणारा आहे. या मल्टीस्टारर सिनेमात महात्मा गांधींच्या सत्याग्रहाचा संदेशला प्रकाश झा आणखी चांगल्या पद्धतीने पोहोचवू शकले असते, मात्र तसे झाले नाही. या सिनेमाचे शूटिंग दिल्ली, भोपाळ आणि अण्णा हजारेंचे गाव राळेगावसिद्धीमध्ये झाले. सलीम-सुलेमान, आदेश श्रीवास्तव आणि इंडियन ओशन बँडने सिनेमाला संगीतबद्ध केले आहे.

या सिनेमाला आमच्याकडून अडीच स्टार्स का ?

1.. सिनेमाचे हीरो अर्थातच दादूजींचा हिंसेदरम्यान झालेला मृत्यू म्हणजे शरीरातून आत्मा निघून जाण्यासारखे आहे.

2.. सिनेमात पब्लिक जोश कमी वाटला. कारण सिनेमातील संघर्ष हा सामान्यांसाठी होता. त्यामुळे आंदोलनातील जोश कमी वाटला. सिनेमाचा शेवट सर्वात निराशाजनक आहे.

3.. मुळधारेपासून हटके असलेले फार कमी सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस करतात. या मल्टीस्टारर सिनेमात अनेक बडे स्टार्स आहेत. अमिताभ बच्चन, करीना कपूर, अजय देवगण, अर्जुन रामपाल हे सर्व कलाकार जे केवळ कमर्शिअलच नव्हे तर हटके सिनेमासाठी फायदेशीर आहेत. सिनेमाचा फस्ट हाफ प्रेक्षकांना खिळवून ठेवतो, मात्र सेकंड हाफमध्ये दिग्दर्शकाला प्रेक्षकांना खिळवून ठेवणे जमले नाही. सिनेमाचे शीर्षक सत्याग्रह आहे, मात्र सिनेमात दाखवण्यात आलेला रक्तपात आणि मसाला टाकण्यासाठी उगाचच करीना-अजयचा किस, लव्ह मेकिंग सीन्स प्रेक्षकांना कहाणीच्या थीमपासून भरकटत नेतात. म्हणजेच सामाजिक संदेश देणा-या सिनेमात कमर्शिअल फिल देण्याचा तडका जमला नाही.

4.. अर्जुन रामपाल पूर्णवेळ कॅमे-यासमोर आहे. मात्र त्याची भूमिका एका साईड हीरोप्रमाणे वाटली. अमिताभ आणि मनोज बाजपेयीच्या अभिनयासमोर कुणीही टिकू शकले नाही.

5.. दामूल या सिनेमाद्वारे फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणा-या दिग्दर्शक प्रकाश झांच्या या सिनेमाकडून बरीच अपेक्षा होता. मृत्यूदंड, गंगाजल आणि राजनीती यांसारखे उत्कृष्ट सिनेमे देणा-या प्रकाश झांचा हा सिनेमा तितका दमदार वाटला नाही.

या सिनेमाला आमच्याकडून अडीच स्टार्स.