आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'स्पेशल 26\' खरंच आहे स्पेशल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हा अक्षय कुमारचा सिनेमा आहे. काही सिनेमांकडून आपल्याला भरपूर अपेक्षा असतात, मात्र तरीदेखील आपल्या मनात त्यांच्याबद्दल साशंका असते. ज्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग या अभिनेत्यांचे सिनेमे बघण्यात जातो, त्यांनाच फक्त ही भीती समजू शकते. मात्र जर सिनेमाचा प्रोमो आकर्षक असेल आणि कथेत दम असेल तर एखादा अभिनेता आपल्या स्टार पॉवरमुळे त्या सिनेमाला यशोशिखरावर पोहोचवू शकतो याचा आपण विचारसुद्धा करु शकत नाही.


सिनेमाच्या सुरुवातीला एका पंजाबी लग्नाचे दृश्य दिसतं. या लग्नात पारंपरिक पद्धतीचा भांगडा सुरु आहे. शिवाय सोणियो, मर जावां या शब्दांचा उल्लेख येथे केला जातोय. आपण उदास होऊ लागतो, मात्र मनात एक आशा असते. हिरोईनची (काजल अग्रवाल) नजर हिरोवर पडते. तिचे कुटुंबीय कुण्या दुस-याच मुलाबरोबर तिचे लग्न लावून देत आहे. मात्र तिला माहितेय की, हिरोची एन्ट्री होईल आणि तो तिला घेऊन जाईल. मात्र मला तुम्हाला सांगताना आनंद होतोय की, या सिनेमाचा टिपिकल रोमान्सबरोबर काही विशेष संबंध नाहीये.


हा एक वैचारिक सिनेमा आहे आणि शेवटपर्यंत तो आपला समजूतदारपणा कायम ठेवतो. सिनेमाच्या प्रोमोजमध्ये हे स्पष्ट दिसलेही आहे. प्रोमोतून आपल्याला सिनेमाबद्दलची थोडी कल्पना आलीच आहे. चोरांचा एक समूह असून अक्षय त्यांचा कॉन्फिडेंट मास्टरमाईंड आहे. अनुपम खेर त्याचा म्हातारा आणि नर्व्हस सहकारी आहे. ते अगदीच सामान्य लोक आहेत, मात्र स्वतःला सीबीआय इन्वेस्टिगेटर्स म्हणून संबोधतात. ते पोलिसांना चकमा देतात आणि सरकारी गाडी घेऊन पसार होतात. हे सगळे चोर दिल्लीतील एका मंत्र्याच्या घरी येतात आणि घरात लपवून ठेवलेला काळा पैसा हस्तगत करतात. संपूर्ण पैसा ते एका मेटलच्या सुटकेसमध्ये गोळा करतात. आपली दिवसाढवळ्या फसवूक झाली आहे, हे मंत्री साहेबांच्या लक्षात येण्यापूर्वीच ही टोळी तेथून रफूचक्कर होते.


मंत्री पोलिसांकडे तक्रार देऊ शकत नाही. कारण ही बातमी वा-यासारखी पसरली तर त्याच्या नेतागिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतील. मात्र या फसवणूकीबद्दल मौन धारण करण्यामागे दुसरेच कारण आहे. लुटलेला पैसा काळा धन आहे. दोन चुकीच्या व्यक्ती बरोबर असू शकत नाहीत. तुम्ही काळ्या पैशाची तक्रार कशी काय नोंदवू शकता ? ही शक्कल लढवून तयार केलेली योजना आहे. अगदी सफाईदारपणे ही लूट केली जाते.


लुटारुंचा हा समूह कधी कधी भेटतो आणि अनेक अन्य सरकारी एजंट्सच्या घरी छापा टाकतो.
सिनेमात केवळ दोनदाच आपण त्यांना लूट करताना बघू शकतो. एकदा नवी दिल्लीत आणि दुस-यांदा कोलकत्यामध्ये. तिसरी लूट मुंबईत होणार असते. हा सिनेमाचा क्लायमॅक्स आहे. काळ आहे 1987चा, जेव्हा एक पांढरी पगडी घालणारे ज्ञानी जैलसिंग भारताचे रा्ष्ट्रपती होते. टाईम्स ऑफ इंडिया तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट पेपर होता. दिग्दर्शकाने काळजीपूर्वक ऐंशीच्या दशकातील दिल्ली सिनेमात उभी केली आहे. आपल्याला कनॉट प्लेसवर मारुती 800 आणि प्रीमिअर पद्मनी या गाड्या धावताना दिसतात. मात्र कोलकता कदाचित तीन दशकांपूर्वीसुद्धा आज आहे तसेच शहर होते. दिग्दर्शक नीरज पांडेने (अ वेनस्डे सिनेमाचा दिग्दर्शक) सिनेमातील बारीक-सारीक गोष्टींवर विशेष लक्ष दिले आहे.


त्याकाळी लॅण्डलाईन फोनच संवादाचे एकमेव साधन होते. जर आजच्या काळाप्रमाणे त्याकाळी सेल फोन असते तर अशा प्रकारची लूट हा समूह करु शकला नसता. मात्र तरीसुद्धा सीबीआयचा एक कर्तबगार अधिकारी हे प्रकरण आपल्या हातात घेऊन त्यांच्यासमोर अडचणी निर्माण करतो. त्याला तिन्ही चोरांना पुराव्यासकट पकडायचे आहे. मात्र त्याच्याकडे या चोरांविरोधात एकही पुरावा नाहीये. सिनेमाची कथा वेगाने पुढे सरकते. आपल्याकडे विचार करायला सुद्धा वेळ नसतो. आपल्याला सिनेमातील मुख्य पात्राच्या बॅकग्राउंडबद्दल अद्यापही फार काही ठाऊक नाहीये.
अशाप्रकारची घटना मुंबईतील चेंबूर ते झवेरी बाजार या परिसरात घडली असल्याचे प्रेक्षक इंटर्व्हलमध्ये आपापसात बोलताना दिसले. या महाठग मिस्टर नटवरलालला कुणीच पकडू शकले नाही.

हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. सिनेमाचा शेवटचा भाग एक रंजक वळण घेतो. ते एक सरप्राइज आहे.

(लेखक प्रख्यात चित्रपट समीक्षक आहेत.)