Home | Star Interview | Adult Movies Made Me Popular: Sunny Leone

'अॅडल्ट सिनेमांमुळेच मी प्रसिद्ध झाले, पण माझ्या भूतकाळावरुन माझी पारख करु नका'

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Mar 21, 2014, 04:22 PM IST

पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी अभिनेत्री सनी लियोन सध्या रागिनी एमएमएस 2 या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहे. याच निमित्ताने तिने अलीकडेच भोपाळला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बातचीत करताना तिने अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली. यावेळी तिच्यासह तिचे पती डेनियल वेबरही हजर होते. भारतात आल्यानंतर सनी हिंदी भाषा शिकली. त्यामुळे तिने जास्तीत जास्त उत्तरे इंग्रजीऐवजी हिंदीतच दिली. काय म्हणाली सनी जाणून घ्या...

 • Adult Movies Made Me Popular: Sunny Leone
  भोपाळ - पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी अभिनेत्री सनी लियोन सध्या रागिनी एमएमएस 2 या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहे. याच निमित्ताने तिने अलीकडेच भोपाळला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बातचीत करताना तिने अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली. यावेळी तिच्यासह तिचे पती डेनियल वेबरही हजर होते. भारतात आल्यानंतर सनी हिंदी भाषा शिकली. त्यामुळे तिने जास्तीत जास्त उत्तरे इंग्रजीऐवजी हिंदीतच दिली. काय म्हणाली सनी जाणून घ्या...
  भूतकाळाबद्दल पश्चाताप वाटतो का?
  सनी - नाही, मुळीच नाही. मी माझ्या भूतकाळामुळे लाजीरवाणी नाहीये. मी जे केले ते माझ्या मर्जीने केले. मला त्याचा मुळीच पश्चाताप वाटत नाही. अॅडल्ट सिनेमे केल्यानंतर माझी मोठी फॅन फॉलोईंग तयार झाली. मला माझे चाहते पसंत करतात. जर मी अॅडल्ट इंडस्ट्रीत काम केले नसते, तर मला लोकांनी ओळखले नसते. बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची संधीही मला मिळाली नसती. माझी लोकप्रियता बघूनच मला त्या शोसाठी आमंत्रित केले गेले होते.
  स्वतःविषयी एका वाक्यात काय सांगशील?
  सनी - लोक जसे समजतात, तशी मी मुळीच नाहीये. माझ्या भूतकाळावरुन माझी पारख करु नका. मी अमेरिकेत वेगळे व्यक्तिमत्त्व होती आणि आता भारतात आल्यानंतर मी त्याच्या अगदी विरुद्ध आहे.

 • Adult Movies Made Me Popular: Sunny Leone
  सिनेमात तुझी भूमिका काय आहे? 
  सनी - सिनेमात मी दोन भूमिका साकारत आहे. एक ग्लॅमरस तर दुसरी भयावह. दोन्ही भूमिका साकारताना मला खूप मजा आली. सिनेमात काम करण्यापूर्वी मी अनेक हॉरर सिनेमे पाहिले. एकताने मला या सिनेमात काम करण्याची संधी दिल्याने मी आनंदी आहे. 
   
  भारतात निवडणूकीचे वातावरण आहे, तुला कोणती स्त्री राजकारणी आवडते? 
  सनी - बचार विचार केल्यानंतर सनीने उत्तर दिले, ''इंदिरा गांधी.. त्यांनी देशासाठी जे केल आणि आयुष्यात जो संघर्ष केला, तो नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यांची मी चाहती आहे.''
   
  एखाद्या पक्षाचा प्रचार करण्याचे आमंत्रण तुला मिळाले आहे का? 
  सनी - नाही मला अद्याप अशी कुठलीही ऑफर मिळालेली नाहीये. मी एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीत काम करुन खुश आहे. प्लीज मला निवडणूकीविषयीचे प्रश्न विचारु नका. 
 • Adult Movies Made Me Popular: Sunny Leone
  तुझे आदर्श कोण आहेत? 
  सनी - एकता कपूर आणि प्रियांका चोप्रा. काही दिवसांपूर्वी एकतासोबत खटके उडाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र त्याविषयी मी सांगू इच्छिते, की असे काहीच नव्हते. आम्ही प्रोफेशनल रिलेशन शेअर करतो. ती खूप मेहनती आहे. त्यामुळे मी तिला माझा आदर्श समजते. याशिवाय मला प्रियांका पसंत आहे. केवळ भारतातच नव्हे तर परदेशात तिने जी लोकप्रियता मिळवली आहे, ते पाहून मी भारावून गेले आहे. मी जेव्हा अमेरिकेत जाते, तेव्हा तिथे तिचे मोठमोठे होर्डिंग्स पाहून मला तिच्यावर गर्व होतो. 
   
  काही शहरांत तुला प्रचार करण्यास मनाई करण्यात आली, त्यामुळे वाईट वाटले का?
  सनी - हो, खूप वाईट वाटले, मी फक्त एवढेच म्हणेल, की ज्या लोकांना माझा सिनेमा बघायचा नाही, त्यांनी बघू नये. ट्रेलर पसंत नसेल, तर टीव्हीचा चॅनल बदला. मात्र शहरात तोडफोड करुन नुकसान करु नका. 
   
  कोणत्या बॉलिवूड अभिनेत्यांसह काम करण्याची इच्छा आहे? 
  सनी - तिन्ही खान (आमिर, सलमान, शाहरुख) माझे फेव्हरेट आहेत. त्यांच्यापैकी एकाची निवड करणे कठीण आहे.  
     

Trending