आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुन म्हणतो, \'माझे आदर्श काका अनिल कपूर आणि सलमान खान\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुनने कमी वयातच आपल्या वडिलांना कामात मदत करायला सुरुवात केली. बोनी कपूर यांची निर्मिती असलेल्या 'वॉन्टेड', 'नो एंट्री' आणि 'मिलेंगे मिलेंगे' या सिनेमांचा अर्जुन सहाय्यक निर्माता होता. एवढेच नाही तर, त्याने वयाच्या 17व्या वर्षी करिश्मा कपूर आणि नाना पाटेकर अभिनीत 'शक्ति: द पावर' या सिनेमात प्रसिध्द तेलगू फिल्मकार कृष्णा वाम्सी यांना दिग्दर्शनात सहाकार्य केले होते. याशिवाय करण जोहरच्या 'कल हो ना हो' आणि 'सलाम-ए-इश्क' या सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
2012मध्ये अर्जुनने हबीब फैजल यांच्या 'इशकजादे' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एका अभिनेत्याच्या रुपात दमदार पदार्पण केले. मागच्या वर्षी तो 'औरंगजेब' सिनेमात दिसला होता आणि आता पुढच्या आठवड्यात रिलीज होणा-या 'गुंडे' सिनेमात तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा त्याचा पहिला मसाला सिनेमा आहे.
या सिनेमाच्या निमित्ताने आमच्या प्रतिनिधींनी अर्जुनशी खास बातचीत केली. अर्जुनने या सिनेमाविषयी सांगितले, की तो आणि रणवीर सिनेमात एकमेकांचे खूप जवळचे मित्र आहेत. परंतु प्रियांकामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अर्जुनच्या या खास मुलाखतीविषयी सांगत आहोत... पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या अर्जुनने कोणत्या प्रश्नाची काय उत्तरे दिली...?