बॉलिवूडमध्ये 'कास्टिंग काऊच' होते मात्र ते काही मुलींपर्यंत मर्यादित आहे. ज्यांच्याजवळ 'टॅलेंट' नाही आणि ज्या मुली 'सेक्स'चा सहारा घेऊन पुढे जाऊ इच्छितात त्य़ांच्यापर्यंतच ते मर्यादित आहे, असे मत दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी व्यक्त केले.
. 'इंकार' चित्रपटातील मुख्य अभिनेता अर्जुन रामपाल आणि दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी डेली भास्करशी बोलताना ही बाब स्पष्ट केली. मिश्रांनी हे ही स्पष्ट केले की, मी अशा काही मुलींचा फोन घेणेही बंद केले आहे. तसेच माझ्या कार्यालयात मी यासाठी सुरक्षारक्षक ठेवले आहेत.
भास्कर समुहाशी खास बातचीत करण्यासाठी अर्जुन रामपाल, सुधीर मिश्रा आणि चित्रपटातील मुख्य अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांनी कंसल्टिंग एडिटर मार्क मॅन्युयल यांच्याशी इंकार चित्रपट आणि तमाम बॉलिवूडबाबत बराच वेळ गप्पा मारल्या. मिश्रांच्या नव्या चित्रपटात कामाच्या ठिकाणी (वर्कप्लेस) महिलांचे होणारे शारिरीक शोषण व छळ यासारख्या गंभीर विषयावर आधारित आहे. चित्रपटातील मुख्य अभिनेता, अभिनेत्री आणि दिग्दर्शक यांच्याशी गप्पा मारलेला व्हिडिओ पाहा...