अलीकडेच रिलीज झालेल्या बेवकुफियाँ या सिनेमात अभिनेता आयुष्मान खुराना सोनम कपूरसह स्क्रिन शेअर करताना दिसला. हा सिनेमा आयुष्मानसाठी खुपच स्पेशल आहे. कारण हा त्याचा पहिला कमर्शिअल सिनेमा आहे. याचनिमित्ताने आमच्या प्रतिनिधी चंद्रा निशासह केलेली ही खास बातचीत...
सोनम कपूरसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
- खूप छान. इंडस्ट्रीत तिची इमेज फॅशनिस्टा म्हणून आहे. मात्र खासगी आयुष्यात ती खूपच साधी तरुणी आहे. अनिल कपूर यांची मुलगी असूनदेखील तिने आपल्या करिअरची सुरुवात सहायक दिग्दर्शकाच्या रुपात केली. आता ती इंडस्ट्रीतील टॉपची अभिनेत्री ठरली आहे.
'नौटंकी साला' या सिनेमातील किसींग सीन्समुळे तुझी पत्नी नाराज असल्याची बातमी होती? ही खरी आहे का आणि भविष्यात इंटीमेट सीन्स करशील का?
- त्या बातम्या अफवा होत्या. माझ्या पत्नीला ठाऊक आहे, की इंटीमेट सीन्स कथेची गरज असते. सिनेमात जर मला बंदुकीची गोळी लागली तर माझा मृत्यू तर होत नाही ना. त्यामुळे रोमँटिक सीन्स करताना तो रोमान्स मी ख-या आयुष्याप्रमाणे फिल करेल, असे होत नाही.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या आणखी काय म्हणाला आयुष्मान...