आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Anushka Sharma Interview In Divyamarathi

अनुष्कासोबत खास गप्पा, गॉडफादरविनाच आम्ही दोघांनीही गाठले यशोशिखर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- क्रिकेटर विराट कोहली आणि माझ्यात खूप साम्य असल्यानेच आम्ही दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र झालो आहोत. आम्ही दोघांनीही कोणीही गॉडफादर नसताना स्वकर्तृत्वाने आपले स्थान निर्माण केले आहे, अशा शब्दांत प्रख्यात अभिनेत्री अनुष्का शर्मा ने आपला प्रियकर विराट कोहलीबाबत हे मत मांडले. फॉक्स स्टार निर्मित आणि अनुराग कश्यप दिग्दर्शित बॉम्बे वेलव्हेट चित्रपटात अनुष्का ६० च्या दशकातील रोझी नावाच्या क्लब गायिकेची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अनुष्काने दिव्य मराठीशी सविस्तर गप्पा केल्या.
बॉम्बे वेलवेटची रोझी और वास्तवातील अनुष्कामध्ये किती फरक आहे?
खूपफरक आहे. बॉम्बे वेलव्हेटमध्ये मी १९६० च्या दशकातील क्लब गायिकेची भूमिका साकारत आहे. संपूर्ण चित्रपटात मला खूपच कमी संवाद आहेत. मला फक्त माझ्या चेह ऱ्यावरील हावभावानेच व्यक्त होण्याची संधी या चित्रपटाच मला मिळाली आहे. वास्तवात मी या भूमिकेच्या अत्यंत विरोधी आहे. मी फटकळ असून मनात जे येते ते मी बोलून दाखवते. मी कोणाची भीडभाड ठेवत नाही. त्यामुळे ही भूमिका साकारताना मला खूप कठिण गेले. दुसरी गोष्ट अशी की यात मी गायिकेची भूमिका करीत असल्याने ही भूमिका अत्यंत वास्तव व्हावी यासाठी दोन महिने गायनाचे प्रशिक्षणही घेतले. १९६० त्या दशकातील ही भूमिका असल्याने त्या वेळच्या नायिकांचा अभ्यास करावा, असे वाटत होते; परंतु त्या वेळच्या नायिकेचा अभ्यास केला असता तर त्याची छाप अभिनयात दिसली असती म्हणून मी कुठल्याही नायिकेच्या भूमिकेचा अभ्यास केला नाही.

एनएच१० सारख्या एका वेगळ्या चित्रपटाद्वारे तू निर्माती झालीस. हा अनुभव कसा होता?
खूपचांगला अनुभव होता. चित्रपट प्रेक्षकांसह समीक्षकांनाही आवडला. खरे तर हा चित्रपट निर्माण करण्यापूर्वी प्रेक्षक याचे स्वागत कसे करतील याची हुरहूर होती, परंतु प्रेक्षकांना आवडला आणि आपण आपल्या कामात यशस्वी झालो त्याबद्दल खूप आनंद झाला. अभिनयामध्ये मी नेहमी वेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करते. तशाच पद्धतीने वेगळ्या विषयांवरील चित्रपट निर्मीती करण्यासाठीच मी निर्मिती क्षेत्रात उतरले आहे. या चित्रपटानंतर आता मी एनएच १० चा दिग्दर्शकाबरोबरच कैनडा नावाचा चित्रपट तयार करत आहे जो ह्यूमन ट्रैफिकिंग विषयावर आधारित आहे. याबरोबरच लेखक अक्षत वर्मा याच्यासोबतही एका चित्रपटाची निर्मिती करण्याची योजना आखली आहे.

स्वतःनिर्मिती करत असलेल्या चित्रपटात कामही करणार का?
बिलकुलनाही. माझी अभिनयाची हौस पुरवण्यासाठी मी निर्माती झालेली नाही. हा एक व्यवसाय असून मी त्यादृष्टीनेच काम करणार आहे. वेगळ्या विषयावरील चित्रपट तयार करायचे असून माझा भर अशा चित्रपटांवरच राहाणार आहेत. जर कथेत माझ्यायोग्य भूमिका असेल तरच मी त्यात काम करीन.

बीसीसीआयनेवर्ल्ड कपच्या वेळेस खेळाडूंच्या पत्नी आणि प्रेमिकांना (वॅग्ज) दौऱ्यावर नेण्यास प्रतिबंध घातला होता त्याबाबत काय वाटते?
वॅग्जशब्द मी ऐकला आहे; परंतु तो काय आहे हे मला ठाऊक नाही. मला तर वाटते की जसे अन् शब्द आहेत तसा हा शब्द आहे. सगळे खेळाडू समजूतदार आहेत आणि कोणत्या वेळी काय करायचे हे त्यांना चांगले ठाऊक आहे. त्यामुळे या विषयावर मी जास्त काही बोलू इच्छित नाही.

लाेकांचा अाम्ही विचार करत नाही
विराटबद्दल काय सांगू? आमच्या दोघांचे नाते एका वेगळ्या पातळीवर असून खूप चांगले आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या विराटने गॉडफादर नसतानाही स्वतःच्या कर्तृत्वाने आपले स्थान तयार केले आहे. आमच्या दोघांमध्ये खूप साम्य आहे. मीसुद्धा बॉलीवूडमध्ये स्वतःचे स्थान मेहनतीने मिळवले आहे. आमच्या दोघांचेही विचार खूप जुळतात. आम्ही दोघेही एकमेकांना समजून घेतो. लोक काय म्हणतील याचा विचार आम्ही करत नाही, तर आम्हाला काय योग्य वाटते ते पाहतो.