आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हीरो होण्यासाठी आलो होतो मुंबईला- दिग्‍दर्शक अभिषेक चौबे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुढच्या वर्षी 10 जानेवारीला प्रदर्शित होणार्‍या ‘डेढ इश्किया’ मधील माधुरी दीक्षित, हुमा कुरेशी, नसिरुद्दीन शहा आणि अर्शद वारसीच्या पात्रांची ओळख प्रेक्षकांना प्रोमो आणि संवादातून झाली असेल. मात्र या चित्रपटाशी जोडलेल्या एका प्रमुख व्यक्तीची लोकांना माहितीच नाही. ते म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक चौबे. अभिषेक यांनी विशाल भारद्वाज यांच्या ‘द ब्लू अंब्रेला’, ‘ओंकारा’, ‘कमीने’, ‘मटरू की बिजली का मंडोला’ या चित्रपटाचे सह-लेखन केले आहे. त्यांची पार्श्वभूमी आणि चित्रपटाच्या प्रवासाविषयी डीबी स्टारने त्यांच्याशी चर्चा केली-

तुझ्या लेखनाची सक्षम बाजू कोणती? त्याला चांगले करण्यासाठी तू काय करतो ?
लहानपणापासून गोष्टी ऐकण्याची व लिहिण्याची आवड होती. या दोन कारणामुळे माझी लेखणी बळकट होत गेली. दिग्दर्शन क्षेत्रात येण्यापूर्वी मी 8-10 स्क्रिप्ट लिहिल्या होत्या. याबरोबरच चित्रपटाच्या तंत्रज्ञानाची समज असणे अत्यंत गरजेचे आहे. मला पुस्तकांची खूप आवड आहे. क्राइम-थ्रिलर, फँटेसी आणि इंग्रजी साहित्य मला खूप आवडते. वाचन मी कमी केलेले नाही. नेहमी माझ्यासोबत एक पुस्तक असतेच.


मूळ गाव कोणते ? शिक्षण कुठे झाले ?
मी उत्तर प्रदेशच्या फैजाबाद जिल्ह्याचा आहे. मोठे कुटंब आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात मोठा झालो. वडील बँकेत फायनान्शियल कन्सलटन्ट होते आणि आई शिक्षिका. आधी आम्ही जमशेदपूरमध्ये राहत होतो, त्यामुळे रांचीमध्ये 10वींपर्यंत शिकलो. हैदराबादमध्ये पुढचे शिक्षण घेतले, नंतर दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली.

मुंबईत कसे आला ?
लहानपणापासूनच चित्रपटाची आवड होती. घरून कधीच याचा विरोध झाला नाही. घरातून प्रत्येक छोट्या गोष्टीला प्रोत्साहन मिळायचे. हीरो व्हायचे असे ठरवले होते मात्र अभ्यासालाही तितकाच वेळ द्यायचो. 1998 मध्ये मॉस कम्युनिकेशनमध्ये प्रवेश घेतला. एक महिना होस्टेलमध्ये राहिलो. मात्र वडिलांना माझी मन:स्थिती माहीत होती. एक दिवस म्हणाले, तुला चित्रपटात काम करायचे आहे ना ? तर चल मुंबईला आणि येथे राहण्यासाठी घर विकत घेऊन दिले.
उर्वरीत मुलाखत वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...