आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परफेक्ट पार्टी लूकसाठी वापरा शिमरचे आऊटफिट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक महिलेला आकर्षणाचे केंद्र असावे, असे वाटत असते. तुम्ही लूक बदलण्याचा विचार करत असाल तर शिमरी ब्लॅक किंवा सोनेरी रंगाचा ए लाइन ड्रेस काळ्या हाय हील सँडलवर घालू शकता. यंदाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात अनेक सेलिब्रिटीज शिमर ड्रेसमध्ये दिसल्या. दीपिका पदुकोनचे शिमर जॅकेट आता ट्रेंड बनला आहे. शिमरी जॅकेट घातल्यामुळे ती सोहळ्यात इतरांपेक्षा उठून दिसत होती. जॅकेटवर तिने काळ्या रंगाची फ्लेयर पँट घातली होती, जी छान दिसत होती.

शिमरसोबत सिक्वेन्सही.. - उन्हाळ्यात शिमरसोबत मेटॅलिक स्टड, ग्लिटर आणि स्पार्कल ट्रेंड हे सिक्वेन्स असतील. नेहा धुपिया या अभिनेत्रीप्रमाणे तुम्हीही फॅशन अ‍ॅडिक्ट असाल तर शिमरी ब्राऊन लाँग स्कर्ट, सिंपल सॅटिन टॉपसोबत घालू शकता. त्यामुळे वेगळा लूक दिसेल. शिमरमुळे कंटाळवाणेपणाही जाणवणार नाही.

मॅक्सी ड्रेसचीही चलती- रिलॅक्स लूकसाठी मॅक्सी ड्रेस चांगला वाटेल. मॅक्सीवर काही काही ठिकाणी सिक्वेन्स लावा. सिक्वेन्स फ्रॉक घालू शकता. त्यावर ग्लिटर शूज आणि अ‍ॅसेसरीज चांगल्या दिसतील. मेटॅलिक रंगांची फॅशन असेल. इलिआना डी क्रूजप्रमाणे डीप नेकचा गोल्डन मेटॅलिक इव्हनिंग गाऊन घालू शकता. अभिनेत्री बेडग्ली मिशका हिने नुकतेच सुंदर सिक्वेन्स गाऊनमध्ये कॅटवॉक केले. अ‍ॅक्ट्रेस अ‍ॅली साबकडे गोल्ड शायनी सिक्वेन्स ड्रेसेस आणि गाऊनचे मोठे कलेक्शन आहे.

सिंपल ड्रेस, ग्लिटरी अ‍ॅसेसरीज - शिमर आऊटफिटमध्ये दोन पर्याय आहेत. पहिला- स्पार्कल फ्रिंजिसपर्यंत मर्यादित ठेवा. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जॅकलिन फर्नांडिसने केले त्याप्रमाणे. त्यांनी सिक्वेन्स साडी नेसली, ज्यात साडीवर विविध ठिकाणी सिक्वेन्स लावले होते. दुसरा- एलिझाबेथ हर्ले आणि हाले बेरीप्रमाणे सिंपल ड्रेसवर सिल्व्हर ग्लिटर क्लच आणि हाय हीड सँडल घातल्यास परिपूर्ण लूक येईल.
पार्टी लूकसाठी व्हा तयार... - पार्टी लूकसाठी ट्रॅडिशनल गोल्ड, सिल्व्हर आणि कॉपर शेड्स ट्राय करू शकता. शिमर घातल्याने तुम्ही लाइटप्रमाणे चमकाल, अशी भीती वाटत असेल तर तुमच्या ड्रेसवर शिमरी सिक्वेन्सच्या जागी मॅट सिक्वेन्स लावा. संपूर्ण आऊटफिटवर शिमर किंवा सिक्वेन्सचा वापर करू नका. यामुळे टॉफी रॅपरसारखा अनुभव मिळणार नाही. ड्रेस सिंपल ठेवण्यासाठी काही जागांवर सिक्वेन्स किंवा ग्लिटर लावा.