आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Do Not Want To Make 100 Crore Films, Makrand Pandey

'100 कोटी कमावणारे सिनेमे बनवण्याची महत्त्वकांक्षा नाही'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता ते दिग्दर्शक असा प्रवास करणारे मकरंद देशपांडे यांच्या मते, पैसे कमावण्याच्या उद्देशाने सिनेमे बनवण्यापेक्षा त्याला मेहनत घेऊन बनवायला हवे. मकरंद देशपांडे दिग्दर्शित 'सोना स्पा' हा सिनेमा येत्या 22 मार्चला रिलीज होतोय.
आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मकरंद देशपांडे यांनी म्हटले की, ''मी सध्या ज्या प्रकारचे सिनेमे करतोय, ते करुन मी खूश आहे. 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल होणारे सिनेमे बनवण्याची माझी इच्छा नाही. माझ्या सिनेमात मला जीव ओतायचा आहे.''
मिराज एन्टरटेन्मेंटच्या बॅनरमध्ये तयार झालेल्या 'सोना स्पा' या सिनेमात नसीरुद्दीन शाह मेन लीडमध्ये आहेत.