आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'गंगनम स्टाईल गाण्यासाठी आयुष्याची संपूर्ण कमाई खर्च केली'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'रंगरेज' या सिनेमात गंगनम स्टाईल गाणे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या गाण्याविषयी जॅकीने सांगितले की, ''या गाण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. या एका गाण्यासाठी मी माझ्या आयुष्याची संपूर्ण कमाई खर्च केली. तेव्हा कुठे हे गाणे मला माझ्या सिनेमात वापरता आले.''

जॅकीने सांगितले की, ''रंगरेज या सिनेमाद्वारे मला स्वतःला सिद्ध करायचे होते. मी आघाडीच्या कलाकारांच्ये रेसमध्ये सगळ्यात मागे आहे. मला अजून खूप मेहनत करायची आहे.''

दिग्दर्शक प्रियदर्शनबरोबर काम करणे म्हणजे एका भिका-याला फेरारी गाडी मिळाल्यासारखे आहे, असे म्हटले जाते. जॅकीला याचा अर्थ विचारला असता तो म्हणाला की, ''जेव्हा मला लोक प्रियदर्शन सरांबरोबर काम करण्याचा अनुभव विचारतात तेव्हा मी फक्त एवढेच म्हणतो की, त्यांच्याबरोबर अनेक दिग्गज काम करतात, मी तर अद्याप नवीनच आहे.''