आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सलमान माझ्यापासून केवळ एक मॅसेज दूर, रणबीरसोबतचे नाते अद्याप स्पष्ट नाही\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात कतरिना कैफ यशोशिखरावर आहे. बॉयफ्रेंड रणबीर कपूरसह नात्यात वितुष्ट निर्माण झाले होते, मात्र आता हे नाते पुन्हा एकदा जुळण्याच्या मार्गावर आहे. 2013 मध्ये तिने केवळ एकच सिनेमा केला तो म्हणजे 'धूम 3'. याविषयी तिला विचारल्यावर ती बिनधास्तपणे म्हणते, एक वर्ष करीनाचे होते, गेले वर्ष दीपिकाच्या नावी राहिले. हा तर नंबर गेम आहे, जो सुरुच राहणार आहे. मी जे ठरवून फिल्म इंडस्ट्रीत आले होते, ते मी मिळवले आहे. मी आज स्वतःला एक उत्कृष्ठ परफॉर्मर म्हणून बघते. अपयश हे मी सर्वप्रथम सलमानसोबतच पाहिले. त्यामुळे करिअचा ग्राफ उंचावला काय आणि खाली गेला काय? यामुळे मला फरक पडत नाही. कदाचित 2015मध्ये मी आघाडीवर असेल.
हे सर्व कतरिनाने आम्हाला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे. रणबीरविषयी तिने म्हटले, की आज रणबीरसोबत चांगले संबंध आहेत; पण उद्या बिघडूही शकतात. जोवर काही स्पष्ट होत नाही, तोवर काही बोलू शकत नाही.
त्यानंतर जेव्हा तिला सलमानविषयी विचारणा झाली तेव्हा तिने सांगितले, की त्याच्यासोबत आजही चांगले संबंध आहेत आणि प्रत्येक पावलावर तो तिला मदत करत असते.
असो, यावर्षी कतरिना कैफ तीन मोठे चित्रपट करत असून या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षी ते प्रदर्शित होतील. तिचा पहिला अँक्शन चित्रपट सैफ अली खानसोबतचा आणि दिग्दर्शक कबीर खान यांचा ‘फँटम’ आहे. दुसरा हृतिक रोशनसोबतचा ‘बँग बँग’ हा असून याचे चित्रीकरणही सुरू झाले आहे. हा देखील अँक्शन-रोमँटिक पट आहे. तिचा तिसरा चित्रपट ‘जग्गा जासूस’ असून याचे चित्रीकरण रणबीर कपूरसोबत लवकरच सुरू होईल. अनुराग बसूच्या ‘बर्फी’ नंतरचा हा पुढील चित्रपट असेल. कतरिना कैफचा याबाबत घेण्यात आलेल्या मुलाखतीचा काही अंश..
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या काय म्हणाली कतरिना...