आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Competition Between Me And Khan's, Says Imran Khan

'खान त्रिकुटासमोर मी छोटा'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमधील त्रिकूट आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान तिघेही माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत. या इंडस्ट्रीत ते 20-25 वर्षांपासून काम करत आहेत. त्यामुळे मी या इंडस्ट्रीत खूप छोटा आहे. मी सलमान खानचा खूप मोठा चाहता आहे. असे इम्रान खानने एका मुलाखतीत सांगितले.

इम्रान म्हणाला की, जे काम मला करायला आवडते तेच येथे करायला मिळत असल्याने मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. मी अभिनयावर खूप प्रेम करतो, असेही त्याने सांगितले.

निवडक सिनेमांप्रमाणे इम्रान जाहिरातीदेखील निवडून करतो. तो म्हणतो की, जाहिराती करणे खूप मोठी जबाबदारी असते. आपल्या व्यक्तिमत्त्वाला ज्या जाहिराती साजेल त्याच मी करतो. मला आंबे आवडत असल्यामुळे मी ‘माझा’ची जाहिरात परिणीतीसोबत केली. परिणीतीसोबत काम करण्याचा अनुभव चांगला आहे. त्यामुळे मी तिचा खूप सन्मान करतो.

इम्रान खान सध्या 'गोरी तेरे प्यार में' आणि 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई 2' या सिनेमांमध्ये बिझी आहे.