आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : 'पोर्न इमेजपासून कधीही सुटका नाही', सनीची कबुली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्न चित्रपटांपासून आपल्या करिअरला सुरुवात करणा-या सनीने पोर्न इमेजमधून कधीच बाहेर पडू शकणार नसल्याची कबुली दिली आहे. सनीच्या मते, लोक तिला त्याच इमेजमध्ये इमॅजिन करतात, त्यामुळे त्या इमेजमधून बाहेर पडणे खूपच कठीण आहे. दिव्य मराठी डॉट कॉमची हिंदी वेबसाईट दैनिक भास्करच्या मुंबई ऑफिसला सनीने नुकतीच भेट दिली.
अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीमधील पदार्पणाबद्दल सनीने सांगितले की, ''पोर्न इंडस्ट्रीचा मी भाग होईल असे मला कधीही वाटले नव्हते, हा फक्त योगायोग होता.''
हॉट आणि सेक्सी सनीला बॉलिवूडमध्ये रोमॅण्टिक चित्रपट करायची इच्छा आहे. बालपणी हिंदी चित्रपट बघून त्यातील गाण्यांवर डान्स केला असून आमिर खानचा 'दिल' हा सिनेमा ब-याच वेळा बघितला असल्याचे सनीने सांगितले. इतकेच नाही तर चित्रपटांमध्ये आमिरला रडताना पाहून स्वतःलाही रडू कोसळत असल्याचेही सनीने सांगितले. सलमान खान आणि ऋतिक रोशन आवडते कलाकार असून विद्या बालन सनीची आवडती अभिनेत्री आहे.
सनीचा 'जिस्म २' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे.