आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लग्न ही गोष्ट माझ्या हातात नाही\', जाणून घ्या आणखी काय-काय म्हणाला सलमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानचे व्यक्तिमत्व 2014मध्ये पूर्ण बदलले आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्याने सिगारेट सोडली आहे. गेल्या वर्षभरापासून त्याने दारूसुध्दा सोडली आहे. आता त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये फक्त ग्रीन टीचे वेगवेगळे प्रकार मिळतात.
सलमान कधी-कधी रागावतो पण लगेच स्वत:च हसायला लागतो. लग्न आणि कोर्टाचे प्रश्न आता हसून टाळतो. गर्लफ्रेंडऐवजी मुली आता फक्त त्याच्या मैत्रीणी बनू लागल्या आहेत. एक्स गर्लफ्रेंडच्या मदतीसाठी त्याच्या घराचे दार आता नेहमी उघडे आहे, मग ती संगीत बिजलानी असो किंवा कतरिना कैफ.
प्रामाणिक आणि साधी दिसणा-या एली अवरामला त्याने प्रसिध्दी मिळवून देण्यासाठी मदत केली, परंतु सिनेमा देण्याची त्याची अजून तरी कोणतीच योजना नाहीये. सलमानच्या या बदलाचे कारण कधी त्याचे वय पन्नाशीला आले असल्याचे सांगितले जाते तर कधी त्याच्या अनुभवाचे कारण सांगितले जाते. सलमानचे जवळचे मित्र सांगतात, की सलमान पहिल्यापासूनच असा आहे, परंतु सध्या लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोण बदलला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या सलमानने आमच्या प्रश्नांची काय उत्तर दिले. वाचा त्याच्याच शब्दांत...