आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ 12वी पर्यंतच शिकली आहे सना खान, जाणून घ्या कशी मिळाली \'जय हो\'मध्ये भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या 'जय हो' सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेली अभिनेत्री सना खानचा जन्म मुंबईत झाला. येथेच ती लहानाची मोठी झाली. सनाने केवळ बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. मुंबईत सना आपल्या आईसोबत राहते. शालेय दिवसांत ती खूपच खोडकर होती. मात्र अभ्यासात ती नेहमी पुढे असायची.
बालपणापासूनच सनाला अभिनयाची आवड होती. बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर सनाने आपला मोर्चा मॉडेलिंगकडे वळवला. काही जाहिरातीत काम केल्यानंतर सनाने तामिळ, तेलगु आणि कन्नड सिनेमांमध्ये अभिनय केला.
जेव्हा सना बिग बॉसच्या सहाव्या पर्वात सहभागी झाली होती, तेव्हा ती सलमानची पहिली पसंत ठरली होती. त्यामुळेच तिला सलमानच्या 'जय हो'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमात तिने कवीता नावाच्या तरुणीची नकारात्मक भूमिका पडद्यावर साकारली. या भूमिकेसाठी तिचे कौतुक होत आहे.
'जय हो'च्या रिलीजनंतर सनाने सिनेमातील आपल्या भूमिकेविषयी आमच्याशी गप्पा मारल्या... काय म्हणाली सना जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...