आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Dutt Is Irreplaceable, Says \'Ghanchakkar\' Director

\'संजय दत्तची जागा कुणीच घेऊ शकत नाही\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'आमिर', 'नो वन किल्ड जेसिका' फेम दिग्दर्शक राजकुमार गुप्ता लवकरच त्यांची नवी कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. राजकुमार गुप्ता यांच्या नवीन सिनेमाचे नाव आहे 'घनचक्कर'. या सिनेमात विद्या बालन आणि इम्रान हाश्मी मेन लीडमध्ये आहेत. याशिवाय सिनेमात अभिनेता संजय दत्त कॅमिओ साकारणार होता. मात्र सुप्रीम कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेनंतर त्याला या सिनेमात काम करणे शक्य होणार नाहीये. 'घनचक्कर'मध्ये संजय दत्त स्वतःचीच भूमिका साकारणार होता. संजयने सिनेमासाठी होकार दिल्यामुळे आपण आनंदात होतो, मात्र आता संजय दत्त सिनेमात काम करु शकत नसल्याचे दुःख वाटत असल्याचे असे राजकुमार गुप्ता यांनी सांगितले.

आता संजय दत्तच्या जागी कुणाची वर्णी लागणार असा प्रश्न राजकुमार गुप्ताला विचारला असता ते म्हणाले की, ''संजय दत्तची जागा कुणीच घेऊ शकत नाही. मी यापूर्वीच सांगितले की, सिनेमात संजय दत्त स्वतःचीच व्यक्तिरेखा साकारणार होता. त्यामुळे आता त्याच्या ऐवजी कुण्या दुस-या अभिनेत्याला कास्ट करण्याचा प्रश्नच उपस्थित राहात नाही. मी सिनेमातून तो पूर्ण सीनच वगळला आहे.''

''माझ्या सिनेमापेक्षा संजय दत्तकडे खूप महत्त्वाचे सिनेमे आहेत. त्या सिनेमांचे शुटिंग पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे संजय दत्तने घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. माझी संजय दत्तकडे कोणतीच तक्रार नाहीये. तो माणूस म्हणून खूप चांगला आहे'' असेही राजकुमार गुप्ता यावेळी म्हणाले.