आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INTERVIEW: 'संधी मिळाल्यास नक्कीच करीना-प्रियांकाबरोबर काम करेल'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'फटा पोस्टर निकला हीरो' या सिनेमाचा हीरो शाहिद कपूर आणि अभिनेत्री इलियाना डिक्रूजने अलीकडेच दिव्यमराठी डॉट कॉमच्या मुंबई ऑफिसला भेट दिली. हे दोघे आपल्या या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने येथे आले होते. यावेळी दोघांनीही सिनेमाबरोबरच आपल्या खासगी आयुष्याशी निगडीत प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली.

शाहिद म्हणाला, की त्याला भविष्यात आपल्या दोन्ही एक्स गर्लफ्रेंड्स म्हणजेच करीना कपूर आणि प्रियांका चोप्राबरोबर काम करण्यास कोणतीही अडचण नाहीये. जर कुठल्या दिग्दर्शकाने त्याला ही संधी दिली, तर तो नक्कीच करीना-प्रियांकाबरोबर काम करेल.

तर दुसरीकडे इलियाना म्हणाली, की तिला पहिल्याच सिनेमात रणबीर कपूरबरोबर काम करताना जेवढी खूप मजा आली तेवढीच या सिनेमात शाहिदबरोबर काम करताना आली. हे दोघेही चांगले अभिनेते आहेत, त्यामुळे एकाबद्दल बोलू शकत नसल्याचे ती म्हणाली.

दोघांची संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा...