आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonam Kapoor And Ayushman Khurana Interview At Dainik Bhaskar Office

'माझ्या बिकिनी घालण्याच्या निर्णयावर वडिलांचा आक्षेप नाही', इति सोनम कपूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री सोनम कपूर सध्या आपल्या आगामी 'बेवकूफियां' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. अलीकडेच आपल्या या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने या दोघांनी दैनिक भास्कर डॉट कॉमच्या मुंबई ऑफिसला भेट दिली. या भेटीदरम्यान दोघांनीही आपल्या सिनेमासोबतच खासगी आयुष्यातील अनेक प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली.
आयुष्मान आणि सोनमचा 'बेवकूफियां' हा रोमँटिक कॉमेडी धाटणीचा सिनेमा आहे. नुपुर अस्थाना यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. 'रांझणा' आणि 'भाग मिल्खा भाग' या सिनेमांत अगदी साधारण दिसलेली सोनम या सिनेमात मात्र बोल्ड अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सिनेमात तिने पहिल्यांदाच बिकिनी आणि किसींग सीन्स दिले आहेत. त्यामुळे सध्या ती बरीच चर्चेत आहे. तिच्याशी बातचीत करताना तिने सिनेमा आणि बिकिनीविषयीच्या प्रश्नांना अगदी विचारपूर्वक उत्तरे दिली. बिकिनी परिधान करण्याच्या निर्णयावर वडील अनिल कपूर यांनी आक्षेप घेतला नसल्याचे सोनमने यावेळी सांगितले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या आणखी काय म्हणाली सोनम...