आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मारुती माझी पहिली गाडी’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राम कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘मेरे डॅड की मारुती’ हा सिनेमा अलीकडेच रिलीज झाला. प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांनीही या सिनेमाला पसंतीची पावती दिली आहे. याचेच औचित्य साधत या सिनेमाविषयी राम कपूरसोबत आम्ही गप्पा मारल्या.

राम म्हणाला की, ''मी यात वडिलांची भूमिका केली आहे. मुलाच्या वाढदिवसाला मी त्याला एक मारुती कार गिफ्ट करतो. पुढची कथा तुम्हाला सिनेमा पाहिल्यावरच कळेल. मी एवढेच सांगेल की हा एक फूल कॉमेडी सिनेमा आहे. संपूर्ण कुटुंबासोबत तुम्ही हा सिनेमा पाहू शकता.
खरं तर या सिनेमाची कथा माझ्या खर्‍या जीवनाशी खूप मिळती-जुळती आहे. याची पूर्ण कथा मारुतीवरच आधारित आहे आणि माझी पहिली गाडीसुद्धा मारुतीच होती. माझ्या वडिलांना न सांगता मी त्यांच्या दोन गाड्या चालवल्या होत्या. फिएट आणि कॉन्टेसा या गाड्या मला खूप आवडायच्या. एकदा तर धडकही झाली होती. वडिलांना कळल्यानंतर ते खूप भडकले होते. काहीच दिवसांत मी त्यांना स्वत: त्याच गाड्या घेऊन दाखवल्या. मात्र मारुती माझी पहिली गाडी आहे. ती गाडी मी आजही जपून ठेवली आहे. मला ही मारुती खूप आवडते. म्हणूनच मी माझ्या मुलीच्या लग्नात तिला मारुती, ऑडी आर 8 ही गाडी गिफ्ट करणार आहे.''

सिनेमाच्या नावावर रामने सांगितले की, मीच या नावाची कल्पना सुचविली होती. कारण पूर्ण सिनेमा मारुतीवर आधारित आहे. तर बघू ही मारुती शरमनच्या फेरारीवर भारी पडते की एक आठवड्यातच गायब होते.