आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अमिताभना दिग्दर्शित करणार नाही’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्याला लहानपणापासूनच चित्रपटांचे आकर्षण होते. असे म्हणतात की, भाऊ कसा असावा, तर मित्रासारखा असावा, हे जीवनाचे संस्कारही त्याने चित्रपटांतूनच शिकले आहेत. मात्र, शाळा-महाविद्यालयांत असताना त्याच्याकडे पुरेसे पैसे नसायचे. असे असतानाही तो चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहत होता. अमिताभच्या एन्ट्रीवर वाजणार्‍या शिट्या आणि टाळ्या.. यापेक्षा कोणते चांगले आयुष्य असेल? बिमल रॉय, राज कपूर, श्याम बेनेगल सर्वांच्या चित्रपटांचे त्याला वेड आहे. श्याम बेनेगल यांचे चित्रपट त्याला परिपूर्ण व्यावसायिक वाटायचे. मर्यादित भांडवल असलेल्या अशा चित्रपटांमध्ये दिग्गज कलावंत नसले तरी त्यांना मोठा प्रेक्षकवर्ग मिळायचा.
इम्तियाज म्हणतो, ‘मी कधीच चित्रपट पाहून निर्मिती करण्यास शिकलो नाही. मी आजही प्रेक्षकांप्रमाणेच चित्रपट पाहतो.’ ‘रॉकस्टार’ आणि ‘जब वी मेट’ नंतर त्याचा ‘हायवे’ प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानेदेखील प्रेक्षक आणि समीक्षकांना समानरीत्या संतुष्ट केले आहे. करिअरमध्ये यशस्वी चित्रपटांची टक्केवारी वाढवणार्‍या या दिग्दर्शकाची भेट झाली. आता तो आगामी ‘विंडो सीट’च्या कामाला लागणार असून त्यात रणबीर-दीपिका यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय अमिताभ बच्चन आणि खान मंडळींसोबत काम करण्याबाबत दिग्दर्शक इम्तियाज अली मनमोकळेपणाने बोलला.
त्याच्याशी केलेली ही खास बातचित..