Home »Star Interview» Star Interview : Kai Po Che Team

ही मैत्री आयुष्यभराची...

दिव्य मराठी वेब टीम | Feb 20, 2013, 10:03 AM IST

  • ही मैत्री आयुष्यभराची...

‘काय पो छे’ सिनेमातील कलावंत अमित साध, राजकुमार यादव आणि सुशांतसिंग राजपूत यांचे असे म्हणणे आहे की, ‘सिनेमाच्या सेटवर जी मैत्री झाली आहे ती आयुष्यभर कायम राहणार आहे.’
अनुपमा चोप्रा यांच्या ‘द फ्रंट रो’ या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. नवीन कलावंत असल्याने त्यांच्यामध्ये जेलसी किंवा असुरक्षितता आहे काय? असे जेव्हा अनुपमाने विचारले तेव्हा अमित म्हणाला, ‘नाही, आम्ही या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान खूप चांगले मित्र बनलो आहोत आणि आयुष्यभर चांगले मित्र राहणार आहोत.’
दिग्दर्शक अभिषेक कपूर म्हणाले की, ‘बॉलिवूडमध्ये मैत्री किती दिवस टिकते यावर काहीच सांगता येणार नाही, परंतु या तिघांची बाँडिंग पाहून ते आधीपासूनच एकमेकांना ओळखतच नाहीत, यावर विश्वास बसत नाही.’ ही मैत्री खरंच आयुष्यभर कायम राहावी, हीच अपेक्षा.

Next Article

Recommended