आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पत्रकारिता अवघड काम आहे'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करीना कपूर म्हणाली आहे, की पत्रकारिता करणे एक अवघड काम आहे. करीनाने 'सत्याग्रह' या सिनेमात टीव्ही रिपोर्टरची भूमिका केली आहे. ती म्हणाली की, माध्यमात काम करणे खूप कठीण आहे. या सिनेमात मी रिपोर्टरची भूमिका करून खुश आहे. ऊन असो की पाऊस, रिपोर्टरला बातम्या करण्यासाठी जावेच लागते. ज्या पत्रकारांचे लक्ष फक्त कामावरच टिकून असते अशाच काही पत्रकारांपासून माझी भूमिका प्रेरित आहे. ही भूमिका करून मला कळले की पत्रकारांवर किती दबाव असतो. प्रकाश झा यांनी मला ही भूमिका करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. प्रकाश झा दिग्दर्शित या सिनेमात करीना कपूरबरोबरच अमिताभ बच्चन, अजय देवगण, अमृता राव, अर्जुन रामपाल आणि मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत आहेत.