आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेहमानमुळे झाले गायिका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ए.आर. रेहमान यांच्या गाण्यामुळेच माझ्यात संगीताची आवड निर्माण झाली. त्यांच्या कौतुकामुळेच मी मन लावून संगीत शिकू शकले आणि चांगली गायिका होऊ शकले, असे सुफी गायिका हर्षदीप कौर म्हणते.

हर्षदीप कौर यांनी सांगितले की, मी लहानपणापासूनच संगीत शिकत आहे. त्यातही रेहमान साहेबांचे संगीत मला खूप आवडते. दिल्लीत ‘चॅनल व्ही’ च्या एका पुरस्कार सोहळ्यात त्यांच्याशी भेटण्याचा योग आला. तेव्हा मी त्यांना सांगितले की, मी तुमची फार मोठी चाहती आहे. ते म्हणाले, ‘चांगले आहे, कीप इट अप’ त्यांच्या याच शब्दाने मी संगीताला गांभीर्याने घेतले आणि काहीच दिवसांत त्यांच्यासोबत गायनाची संधी मिळाली आणि माझे स्वप्न पूर्ण झाले. त्यांच्या दिग्दर्शनात पहिल्यांदाच ‘रंग दे बसंती’ मध्ये ‘एक ओमकार..’ गाण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी त्यांच्यासोबत अनेक कॉन्सर्ट केले.

पगडी टीव्हीची भेट
एनडीटीव्ही इमॅजिन चॅनलवर 2008 मध्ये सुरू असलेल्या रिअलिटी शो ‘जुनून: कुछ कर दिखाने का’ या कार्यक्रमात मी भाग घेतला होता. त्या शोमध्ये उस्ताद राहत फतेह अली खान माझे मेंटॉर होते. शोच्या फायनलमध्ये अमिताभ बच्चन प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. या कार्यक्रमानेच मला सुफी गायिकेची ओळख दिली. ही पगडीसुद्धा मला या टीव्हीनेच दिली आहे. त्यामुळे मी माझ्या कार्यक्रमात पगडीशिवाय गाणे गात नाही.

रेशमाशी तुलना केली जाते
मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते. आज ज्या प्रकारची गाणी गायली जात आहेत. ती मला आवडत नाहीत. पाकिस्तानी गायिका रेशमासोबत माझी तुलना केली जाते. त्यांनी गायलेले ‘लंबी जुदाई.’ हे गाणे मला खूप आवडते. तसेच मी शाहरुखचीसुद्धा मोठी चाहती आहे.