आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 100 Crore Club Movie List After Yeh Jawani Hai Deewani

PHOTOS : हे आहेत \'100 करोर क्लब\'मध्ये सामील झालेले सिनेमे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण स्टारर 'ये जवानी है दिवानी' या सिनेमाने 100 कोटी क्लबमध्ये दमदार एंट्री केली आहे. या सिनेमाने सलमान खानच्या ‘दबंग-2’चा रेकॉर्ड मोडित काढला आहे. रिलीजच्या पाच दिवसांतच शंभर कोटींची कमाई करणारा हा पहिला सिनेमा ठरला आहे. सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दोन दिवसांतच 19.45 कोटींची कमाई केली होती.
करण जोहर प्रॉडक्शनच्या या सिनेमाच्या निर्मितीत चाळीस कोटींचा खर्च आला होता. मात्र रिलीजच्या पाच दिवसांतच या सिनेमाने निर्मिती खर्चाच्या दुप्पट कमाई केली आहे. हा सिनेमा लवकरच 200 कोटींचा पल्ला गाठेल, असे चित्रपट जाणकारांना वाटते. भारतात जवळपास तीन हजार स्क्रिनवर हा सिनेमा रिलीज करण्यात आला होता.

'ये जवानी है दिवानी'बरोबरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झालेल्या काही निवड सिनेमांवर एक नजर टाकुया...