आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 16 Months Old Aaradhya Bachchan Resites Gayantri Mantra

16 महिन्याच्या आराध्याची कमाल, गायत्री मंत्राचा करते जप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानायक अमिताभ बच्चन यांची नात आराध्या आता गायत्री मंत्राचा जप करायला लागली आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, ऐश्वर्याने आपल्या काही जवळच्या मित्रांना सांगितले की, तिची लाडकी लेक आराध्या एक ते दहापर्यंत पाढे, ए टू झेड अल्फाबेटबरोबरच गायत्री मंत्राचा जपसुद्धा करते.
आजोबा आणि आईवडिलांचे सगळे गुण आराध्यामध्ये आहेत.
आराध्याचा स्मार्टनेस बघून बच्चन कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. विशेषतः ऐश्वर्या आपल्या लाडक्या लेकीचे कौतूक करताना थकत नाही.
यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नातीच्या शार्प मेमरीचे कौतूक केले आहे. त्यांनी एकदा आपल्या ब्लॉगवर याविषयी लिहिले होते की, आराध्या टॅबवर आपल्या आवडीची गाणी स्वतः लावून ऐकत असते.