आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘2 स्टेट्स’च्या ट्रेलर लाँचला पोहोचले आलिया-अर्जुन, बघा PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 2014 या वर्षीतील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित '2 स्टेट्स' या सिनेमाचा 28 फेब्रुवारी रोजी ट्रेलर लाँच करण्यात आला. या ट्रेलर लाँचिंगला सिनेमातील मेन लीड स्टार्स आलिया भट्ट आणि अर्जुन कपूर हजर होते. या दोघांसोबत निर्माता साजिद नाडियाडवाला, करण जोहर, दिग्दर्शक अभिषेक वर्मन आणि चेतन भगतही दिसले.
अभिषेक चौबे दिग्दर्शित या सिनेमात नॉर्थ इंडियन पंजाबी कुटुंब आणि साउथ इंडियन कुटुंबाचे फिल्मी कॉकटेल दाखवण्यात आले आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अर्जुन आणि आलिया पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत. या दोघांचाही सिनेमातील लूक एकदम हटके आहे.
चेतन भगत यांच्या गाजलेल्या '2 स्टेट्स' या कादंबरीवर या सिनेमाचे कथानक बेतले आहे. सिनेमाची कथा पंजाबी मुलगा कृष मल्होत्रा (अर्जुन कपूर) आणि तामिळ मुलगी अनन्या स्वामीनाथन (आलिया) यांच्या भोवती गुंफण्यात आली आहे. या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम असते, मात्र दोघांची संस्कृती, पद्धती वेगळ्या असतात. अशात या दोघांना एकमेकांच्या कुटुंबीयांचे मन जिंकण्याचे आव्हान स्वीकारावे लागते. त्यातून पुढे कथानक सरकत जाते.
सिनेमाचा जो पहिला ट्रेलर लाँच करण्यात आला आहे, तो पाहता या सिनेमात रोमान्स, कॉमेडी आणि ट्रॅजेडीचा मसालेदार तडका बघायला मिळाला आहे. येत्या 18 एप्रिल रोजी सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहेत,
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा '2 स्टेट्स'च्या ट्रेलर लाँचिंगच्या वेळी क्लिक झालेले अर्जुन आणि आलियाचे वेगवेगळे मूड..