आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा 200 कोटींची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या बॉलिवूडमध्ये कोणत्या सिनेमाने किती कमाई केली आहे. यावरच सगळ्यांच्या नजरा असतात. शंभर किंवा दोनशे कोटींच्या घरात आपला सिनेमा जावा म्हणून प्रत्येक अभिनेता आपापल्या परीने काम करतो. यात बॉलिवूडचे तिन्ही खान सगळ्यात पुढे असतात.

दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या ‘थ्री इडियट्स’ने 2009 मध्ये बॉक्स ऑफिसवर 202 कोटींचा व्यवसाय करून इतिहास बनवला होता. हा रेकॉर्ड गेल्या चार वर्षांपासून कोणीच मोडला नाही. मात्र यावर्षी स्वत: आमिर, शाहरुख आणि सलमान हा विक्रम मोडण्याचा प्रयत्न करतील.

यावर्षी सलमान ‘मेंटल’, ‘किक’ आणि प्रभुदेवाच्या आगामी सिनेमात दिसणार आहे, तर आमिर या वर्षी राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या ‘पीके’ आणि ‘धूम 3’ मध्ये दिसणार आहे. या सिनेमाद्वारे तो नवीन विक्रम बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनात बनत असलेला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ 200 कोटींचा व्यवसाय नक्कीच करेल, अशी अपेक्षा शाहरुखला आहे.

तर शंभर कोटीच्या स्पध्रेत बॉलिवूडचे इतर कलावंतसुद्धा ओहत. यात अजय देवगण, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, ऋतिक रोशन, जॉन अब्राहमसुद्धा आहेत. गेल्या वर्षीच अजयच्या ‘सिंघम’ आणि ‘बोल बच्चन’ ने शंभर कोट क्लबमध्ये हजेरी लावली होती. तर पाहू कोणत्या अभिनेत्याचा सिनेमा हा आकडा पार करू शकेल. घोडा मैदान पुढे आहे, पाहू कोण ‘बाजी’ मारतो.