आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाईकवेडी\' गुल पनाग; स्वत:च्या विवाहाच्या दिवशीही चालवली बाईक!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री गुल पनागचा आज (शुक्रवारी) 35 वा वाढदिवस आहे. चंदीगडमध्‍ये 1979 साली याच दिवशी गुल पनागचा जन्‍म झाला होता. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षीच गुल पनाग हिने 'मिस इंडिया' किताब पटकावला. त्यानंतर ती विश्‍श्वसुंदरी स्‍पर्धेतही सहभागी झाली होती. 2003 साली प्रदर्शित झालेला 'धूप' या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्‍ये पदार्पण केले.
गुल आपल्‍या तीन छंदामुळे जास्‍त चर्चेत राहिली आहे. तिची पहिली आवड आहे बाईक चालवणे. तिच्‍याकडे रॉयल एनफील्‍ड ही बाईक आहे. उल्लेखनिय म्हणजे, गुल पनागच्या लग्नात तिचा नवरा घोड्याऐवजी चक्क 'बाईक'वरच स्वार होऊन आला होता. विवाहाच्या दिवशीही गुल पनाग हिला बाईक चालवण्याचा मोह आवरता आला नव्हता.
गुल पनागला कुत्रे खूप आवडतात. तिने तिच्‍या घरी कुत्रे पाळले आहेत. सकाळ असो की, संध्‍याकाळी ती आपल्या कुत्र्यांसोबतच खेळताना दिसते.
गुल पनागला ऑडी कार चालवणेही खूप आवडते. 2011 साली तिच्‍याकडे 'ऑडी क्‍यु-5' कार होती. गुल पनाग हिने हे तीन छंद आज वयाच्या 35 व्या वर्षीपर्यंत जोपासले आहेत.
पुढील स्‍लाईडवर पाहा, गुल पनागची भन्‍नाट छायाचित्रे...