आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 3 Idiots Bags Nomination In Japan Academy Awards

‘3 इडियट्स’ला जपानी ‘ऑस्कर’ मध्ये नामांकन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात 2009मध्ये प्रदर्शित झालेला आणि सर्वाधिक व्यवसाय करणारा ‘3 इडियट्स’ आतादेखील प्रसिद्धी आणि पैसे कमावत आहे. राजकुमार हिराणींच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या बॉलिवूड ब्लॉकबस्टरला 37 व्या जपान अकॅडमी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट विदेशी भाषेचा चित्रपट म्हणून नामांकन देण्यात आले आहे.
या श्रेणीमध्ये हॉलिवूडच्या चित्रपटांनादेखील नामांकन मिळाले आहे. आमिर खान अणि राजू हिराणींचा हा चित्रपट ‘कॅप्टन फिलिप्स’, ‘जँगो अनचेन्ड’, ‘ग्रॅव्हिटी’ आणि ‘ल मिझेरेबल’ या चित्रपटांशी स्पर्धा करणार आहे. या चित्रपटांची निवड निप्पो अकॅडमी अवॉर्ड्सच्या सदस्याच्या मतांद्वारे करण्यात आली आहे. या चित्रपटांचा पुरस्कार सोहळा 7 मार्चला आयोजित करण्यात आला आहे. ‘3 इडियट्स’ गेल्या वर्षी जूनमध्ये जपानमधील सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला होता.