आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी स्वीकारला इस्लाम धर्म तर कुणी झाले ख्रिश्चन, हे आहेत धर्म परिवर्तन करणारे CELEBS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूफी गायक हंसराज हंस यांनी इस्लाम धर्म कबूल केला आहे, असे वृत्त पाकिस्तानमधील प्रसार माध्यमांनी दिले आहे. हंस यांनी लवकरच मदीनात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 'पाकिस्तान अफेयर्स' आणि 'यू न्यूज टीव्ही' पोर्टल्स यांनी दावा केला आहे, की हंस यांनी लाहोरमध्ये आमच्याशी बोलताना ही माहिती दिली. यात हंस यांनी म्हटले आहे, की बऱ्याच कालावधीपासून मी इस्लामिक साहित्य वाचत आहे. या धर्मातील मान्यतांवर माझा विश्वास वाढला आहे. मी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. आता मी लवकरच मदीनात जावू इ्च्छित आहे. हंस यांनी आता मोहम्मद यूसूफ हे नाव धारण केले आहे. मात्र जालंधर येथे राहत असलेला त्यांचा मुलगा युवराज हंस यांनी ही बाब फेटाळून लावली आहे. माझ्या वडिलांनी धर्म बदललेला नाही. ते सध्या जालंधर येथेच आहेत. त्यांची तब्बेत सध्या ठीक नाही. त्यामुळे ते बोलू शकत नाहीत, असे सांगितले आहे.
कोण आहेत हंसराज हंस -
हंसराज एक पंजाबी सिंगर आणि राजकारणी आहेत. 30 नोव्हेंबर 1953 मध्ये शफीपुर (जालंधर) मध्ये जन्मलेले आणि तेथेच लहानाचे मोठे झालेले हंसराज यांनी 1983 मध्ये संगीत क्षेत्रात पदार्पण केले. टोटे टोटे हो गया.. (बिच्छू), खाली दिल नहीं जान भी है मंगदा... (कच्चे धागे) आणि इक तू ही तू तू ही तू... (मौसम) यांसह बरीच हिट गाणी गायली आहेत. हंसराज हंस यांच्या स्टाइल आणि आवाजाने प्रभावित होऊन त्यांच्या गुरुंनी त्यांना हंस हे आडनाव दिले होते.
अनेक सेलिब्रिटींनी केलंय धर्म परिवर्तन -
सेलिब्रिटींनी धर्म परिवर्तन केल्याची ही पहिलीच घटना नाहीये. यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींचे नाव या यादीत आले आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटींविषयी सांगतोय, ज्यांनी दुस-या धर्माचा स्वीकार केला.
कोण आहेत हे सेलेब्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...