आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीचा डंका, विक्रम गोखले सर्वोत्कृष्ट अभिनेते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

60 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच दिल्लीत करण्यात आली. यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दोन अभिनेत्यांना विभागून देण्यात आला आहे. 'पान सिंग तोम'र सिनेमातील अभिनयासाठी अभिनेता इरफान खान आणि 'अनुमती' या मराठी सिनेमातील भूमिकेसाठी अभिनेते विक्रम गोखले यांची यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्कारावर अभिनेत्री उषा जाधवने आपली मोहोर उमटवली आहे. 'धग' या सिनेमातील भूमिकेसाठी उषा जाधवची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.

इरफान खानची प्रमुख भूमिका असलेल्या 'पान सिंग तोमर' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सुवर्णकमळ जाहीर झाले आहे.

यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारात मराठीचा डंका वाजला आहे. कारण सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, पार्श्वगायन, संगीत या सर्वच प्रकारात मराठी कलाकारांना पुरस्कार मिळाला आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी निवड झालेल्या विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

- सर्वोत्कृष्ट अभिनेता - विक्रम गोखले (अनुमती) आणि इरफान खान (पान सिंग तोमर) यांना विभागून.

- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - उषा जाधव (धग)

- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - आरती अंकलीकर (संहिता)

- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - शिवाजी पाटील (धग)

- सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा - इन्व्हेस्टमेंट

- रत्नाकर मतकरींना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी रजत कमल

- सर्वोत्कृष्ट संगीत - शैलेंद्र बर्वे (संहिता)

- सर्वोत्कृष्ट संपादन - नम्रता राव (कहानी)

- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - अन्नू कपूर (विकी डोनर)

- सर्वोत्कृष्ट बालकलाकार - वीरेन प्रताप

- सर्वोत्कृष्ट गीतकार - प्रसून जोशी

- सर्वोत्कृष्ट आर्ट कल्चरल फिल्म - मोदी खान्याच्या दोन गोष्टी

- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - शंकर महादेवन (पान सिंग तोमर)

- स्पेशल ज्युरी अवॉर्ड - नवाजुद्दीन सिद्दिकी

- सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार - कहानी

- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - डॉली अहलुवालिया (विकी डोनर)

- सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक - पं. बिरजू महाराज

- सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म - पान सिंग तोमर

- सर्वोत्कृष्ट अँडव्हेंचर फिल्म - मणिपुरी पोनी

- सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- ईगा

- सर्वोत्कृष्ट वेशभूषा - पूर्णिमा (परदेसी)

- सर्वोत्कृष्ट अडप्टोडेड स्क्रीनप्ले - ओह माय गॉड

- सर्वोत्कृष्ट साऊंड रेकॉर्डिंग - गँग्ज ऑफ वासेपूर

- सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन आणि कला दिग्दर्शन - विश्वरुपम

- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पदार्पणाचा इंदिरा गांधी पुरस्कार - चिट्टागोंग

- सर्वोत्कृष्ट रहस्यपट - इंशाअल्लाह कश्मीर

- ज्युरींचा विशेष पुरस्कार - परिणीती चोप्रा

- सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट - विकी डोनर