आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 70's Decad Popular High Waist Pant Again Booming

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

70 च्या दशकातील लोकप्रिय हाय वेस्ट पँटची पुन्हा चलती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाय वेस्ट पँट आता पुन्हा तरुणींच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय रॅम्प शो आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात अनेक मॉडेल आणि अभिनेत्री हाय वेस्ट पँट परिधान करण्यास प्राधान्य देतात. या स्टाइलसाठी परफेक्ट फिगर असलीच पाहिजे असे नाही. वॉशबोर्ड अ‍ॅब्स आणि अ‍ॅटिट्यूड असला म्हणजे झाले.
सुपर मॉडेल एल मॅकफर्सनला हाय वेस्ट पँट परिधान करणे आवडते. याचे श्रेय तिच्या टू-डाय-फॉर फिगरला नसून योग्य कॉम्बिनेशनच्या ज्ञानाला आहे. तिने हाय वेस्ट पँट व्हाइट बटण डाऊन ब्लाऊजसोबत परिधान केली होती.


पँटमध्ये पायजमा स्टाइल
अभिनेत्री सोनम कपूरप्रमाणे हाय वेस्ट पँट घोट्याजवळ घट्ट करण्याची गरज नाही. पायजमा स्टाइल किंवा घोटे उघडे ठेवल्यास चांगले दिसेल. सोनम कपूरच्या फिगरवर टेपरिंग स्टाइल शोभून दिसते, पण ही स्टाइल सर्वांनाच शोभून दिसते असे नाही.


फ्लोरल प्रिंट्स उठून दिसतात
तुमची उंची अधिक नसेल, तर तुम्ही हाय हील घालून बॅलन्स करा आणि ही पँट परिधान करा. हील घातल्यास पँटचे फ्लेयर मोकळे होण्यास पुरेशी जागा मिळते. अभिनेत्री बॅलेंशिगाने स्टीमलाइन लूकसाठी पँटला नॅरो एंड लूक दिला. जॅसन वू हिने फ्लोरल प्रिंट्सची हाय वेस्ट पँट परिधान करणे पसंत केले. यामुळे परफेक्ट समर लूक मिळाला.

हाय वेस्ट पँट परिधान केलेल्‍या काही बेलिब्रेटींचे छायाचित्रे पुढे पाहा