आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 92.7 BIG FM Celebrates Music Maestro Khayyam’s 88th Birthday On ‘Carvaan E Ghazal With Talat Aziz’

92.7 बिग एफएम \'कारवाँ-ए-गझल...\'मध्ये संगीत उस्ताद खय्याम यांचा वाढदिवस केला साजरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील लोकप्रिय एफएफम नेटवर्क असलेल्या 92.7 बिग एफएमने भारतातील सर्वाधिक लोकप्रिय संगीत सम्राट खय्याम यांचा 88वा वाढदिवस साजरा केला. गझल उस्ताद तलद अझित यांच्यासोबत 92.7 एफएम आज 'कारवाँ-ए-गझल विथ तलत'च्या खास भागात खय्याम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शनिवारी 21 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता प्रसारित केल्या जाणा-या या भागात श्रोत्यांना या दिग्गज संगातकाराची गाणी ऐकवण्यास मिळणार आहे.
खय्यामसाहेब यांनी 70 आणि 80च्या दशकातील जे श्रवणीय संगीत दिले, त्याला तोड नाही. त्यांनी 'त्रिशूल', 'थोडी सी बेवफाई', 'बाझार', 'कभी कभी', 'उमराव जान', आणि 'नूरी'सारख्या सिनेमांना संगीत दिले आहे. त्यांनी कविता क्षेत्रात समकालीन आणि दिग्दज मंडळींसोबत काम केले आहे. त्यांच्या कामावर मिर्झा गालिब, दाग, वालीसाहेब, अली सरदार जाफरी, मजरूह सुलतानपुरी, साहिर सुधियानवी यांचा विलक्षणीय प्रभाव जाणवतो.
खय्याम यांच्या चाहत्यांना त्यांचे संगीत ऐकवण्याची पर्वणी देण्याकरीता आणि या दिग्गज संगीतकारचा गौरव करण्याकरिता 92.7 बिग एफएम खय्याम साहेबांना शोमध्ये पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. या खास भागात श्रोत्यांना कधीही ऐकायला मिळाले नसतील असे किस्से, त्यांची यशोगाथा, त्यांना आलेले रंजक अनुभव आणि घटना ऐकायला मिळणार आहेत. 92.7 बिग एफएम स्टुडीओमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात तलतसाहेब आणि खय्यामसाहेब प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधणार आहेत आणि 'कारवाँ-ए-गझल'च्या खास भागाची झलक देतील.