आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Idol Audition Kerala Lekshmi Jayan Blast On Stage In Male And Female Voice

Indian Idol 10: तरुणीने मेल-फीमेलच्या आवाजात गायले \'ऊह ला ला\', दंग झाले जज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: 'इंडियन आइडल-10' या सांगितिक रिअॅलिटी शोसाठी ऑडिशन सुरु झाली आहे. ऑडिशन देण्यासाठी आलेल्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. केरळच्या त्रिवेंद्रममध्ये राहणा-या या तरुणीचे नाव लक्ष्मी जयन का आहे. लक्ष्मीने इमरान हाश्मी आणि विद्या बालन स्टारर 'डर्टी पिक्चर' या चित्रपटातील 'ऊह ला ला, तू है मेरी फैंटसी' हे गाणे गायले. खास गोष्ट म्हणजे हे गाणे तिने स्त्री आणि पुरुषाच्या आवाजात सादर केले. तिचे गाणे ऐकून शोचे जज अनु मलिक, नेहा कक्कड आणि विशाल ददलानी केवळ आश्चर्यचकितच झाले नाहीत, तर अनु यांनी शिट्टीदेखील वाजवली. विशाल म्हणाले,  'तुझ्यासारखा यापुर्वी कधी कुणी पाहिला नाही.' लक्ष्मीचा गाण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. येत्या 7 जुलैपासून हा शो सोनी टीव्हीवर सुरु होणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...