आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • TV Actress Dipika Kakar Newlywed Shoaib Ibrahim Says Planning Baby Next Year And Ready To Become A Housewife

TV अॅक्ट्रेस दीपिका सुरु करणार फॅमिली प्लानिंग, 2019मध्ये व्हायचे आहे आई, करिअर सोडून होणार हाऊसवाईफ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'ससुराल सिमर का' फेम सिमर अर्थातच अभिनेत्री दीपिका कक्कड याचवर्षी 22 फेब्रुवारी रोजी तिचा मुस्लिम बॉयफ्रेंड आणि टीव्ही अभिनेता शोएब इब्राहिमसोबत विवाहबद्ध झाली. आता दीपिका आणि शोएब यांनी फॅमिली प्लानिंग सुरु केली आहेत. स्वतः दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले, की तिला 2019 मध्ये आई व्हायचे आहे. यासाठी ती लवकरच प्लानिंग सुरु करणआर आहे. इतकेच नाही तर प्रेग्नेंसीची बातमी कळताच ती करिअर सोडून हाऊस वाईफ व्हायला तयार आहे. दीपिकाच्या हातात सध्या एकही प्रोजेक्ट नाही. 


टीव्ही शोच्या सेटवर सुरु झाली दीपिका-शोएबची लव्ह स्टोरी... 
- दीपिका आणि शोएब यांनी 2018 मध्ये लग्न केले. पण त्यांची लव्ह स्टोरी ससूराल सिमर का या मालिकेच्या सेटवर 2013 पासून सुरु झाली होती. शोएबने 2013 मध्ये ही मालिका सोडली होती. 
- दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले होते, "शोएबने ही मालिका सोडल्यानंतर मी सेटवर इतर लोकांशी दुरावा निर्माण केला होता. जेव्हा शोएब त्याच्या एका प्रोजेक्टसाठी 40 िदवस आउटडोअर शूटवर गेला, तेव्हा मी त्याला भेटू शकली नव्हती. त्याकाळात मला त्याची चिंता सतावत होती." 
- अशीच एक घटना शोएबने रिकॉल केली होती, तो म्हणाला होता, "माझ्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाले होते. मी एकुलता एक मुलगा असल्याने त्याकाळात आई आणि बहिणीसोबत होतो. त्याकाळात दीपिकाने आम्हाला इमोशनली सपोर्ट केले होते."
- दीपिकाचे शोएबसोबतचे हे दुसरे लग्न आहे, तर शोएबचे हे पहिलेच लग्न आहे. शोएबपूर्वी दीपिकाचे लग्न रौनक मेहतासोबत झाले होते. 2013 मध्ये त्यांचे लग्न झाले, पण जानेवारी 2015 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. 

 

दीपिकाने सासरच्यांसोबत साजरी केली पहिली ईद...
- दीपिकाने लग्नानंतर मुस्लिम धर्माचा स्वीकार केला आणि आता तिचे नाव फैजा आहे. 
- लग्नानंतर दीपिकाने पती शोएब इब्राहिम आणि सासरच्या मंडळींसोबत पहिली ईद साजरी केली होती. 
- दीपिकाने यानिमित्ताने रोजा ठेवणे कठीण गेले नाही, कारण लग्नापूर्वीदेखील तिने रोजा ठेवला होता. 

 

'ससुराल सिमर का' शोमधून मिळाली होती ओळख..  
- दीपिका कक्कडने 'नीर बहे तेरे नैना देवी' या मालिकेतून अभिनय करिअरची सुरुवात केली होती.
- तिला खरी ओळख 'ससुराल सिमर का' या मालिकेतून मिळाली. 'बेइंतहा', 'शास्त्री सिस्टर्स', 'स्वांगिनी', 'बालिका वधू', 'कोई लौट के आया है', 'सजन रे फिर झूठ मत बोलो' या मालिकांमध्ये दीपिका झळकली आहे. 

बातम्या आणखी आहेत...