आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : रेहमानचे फेसबूकवर \'जय हो\'... या कलाकारांना मागे टाकत ठरले नंबर वन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्कर पुरस्कार विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांना फेसबूक या सोशल नेटवर्किंग साईटवर एक कोटीपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. हा आकडा पार करणारे रेहमान पहिले भारतीय ठरले आहेत. तब्बल एक कोटीपेक्षा जास्त चाहत्यांनी रेहमान यांचे फेसबूक पेज लाईक केले आहे. रेहमानच्या फेसबूक पेजवरील लाईक्सचा आकडा 10,138,509 एवढा आहे. तर 81,159 लोकांनी त्याविषयी चर्चा केली आहे.

रेहमानने चाहत्यांच्या या प्रेमासाठी त्यांना धन्यवाद म्हटले आहे. 'एक कोटी धन्यवाद' या शब्दांत रेहमान यांनी चाहत्यांना धन्यवाद म्हटले आहे.

रेहमान यांच्याबरोबरच सलमान खान, सचिन तेंडुलकर, आमिर खान, अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांना किती लाईक्स मिळाले यावर एक नजर टाकुया...