आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत झाले अहानाचे दुस-यांदा Wedding Reception, स्टार्ससह पोहोचली राजकीय वर्तुळातील मंडळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची धाकटी कन्या अहाना देओलचे वेडिंग रिसेप्शन बुधवारी दिल्लीतील कपासहेरा स्थित वोहरा फार्म हाऊसमध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी अहाना आणि वैभव या नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी बॉलिवूडसह राजकीय वर्तुळातील मोठे चेहरे आणि परदेशी पाहुणे पार्टीत पोहोचले होते.
बुधवारी उशीरा रात्रीपर्यंत रंगलेल्या या वेडिंग रिसेप्शन पार्टीसाठी दिल्लीतील रस्त्यांवरही सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमस्थळी अहाना आणि वैभव हातात हात घेऊन दाखल झाले. तर दुसरीकडे धर्मेंद्र आणि हेमामालिनी पाहुण्यांचे स्वागत करताना दिसले.
या वेडिंग रिसेप्शन पार्टीत बीजेपी नेता लालकृष्ण अडवाणी, राजनाथसिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली, शाहनवाज हुसैने, काँग्रेसचे सुरेश कलमाजी, राजीव शुक्ला, हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा, फारुख अब्दुला, रेणुका चौधरी आणि बॉलिवूड अभिनेत्री वहिदा रहमान यांनी हजेरी लावली होती.
अहानाच्या लग्नानंतर मुंबईत आयोजित रिसेप्शन पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. मात्र तिचे भाऊ सनी आणि बॉबी देओल यांची लग्न आणि रिसेप्शन पार्टीला अनुपस्थिती होती. यापूर्वी ईशा देओलच्या लग्नातही हे दोघे गैरहजर होते.
अहाना देओलचे लग्न 2 फेब्रुवारी रोजी मुंबईत झाले होते. वैभव आणि अहानाचे लग्न बॉलिवूडमधील शाही लग्नापैकी एक होते. अहानाचे फक्त लग्नच नाही तर लग्नाशी संबंधित सर्वच कार्यक्रम खुप खास होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा अहानाच्या दिल्लीतील रिसेप्शन पार्टीची खास छायाचित्रे...